

बॉलीवूडच्या सिक्वेल सीझनमध्ये नुकतीच सन ऑफ सरदार 2 आणि धडक 2 या सिनेमांची भर पडली आहे. हे दोन सिनेमे या शुक्रवारी रिलीज झाले. दोन्ही सिनेमानचा जॉनर वेगळा आहे. सन ऑफ सरदार 2 हा कॉमेडी सिनेमा आहे. यात अजय देवगण आणि मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत आहेत. या शिवाय भोजपुरी सुपरस्टार रवीकिशनदेखील या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसत आहे. (Entertainment News Update)
2012 मध्ये या सिनेमाचा प्रीक्वेल आला होता. अर्थात अजय वगळता पार्ट 2 चा पहिल्या भागाशी फारसा संबंध नाही.
आता विषय धडक 2 चा. इशान खट्टर आणि जान्हवी कपूरने या सिनेमाच्या प्रीक्वेलमध्ये काम केले होते. तर धडक 2 मध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डीमरी हे कलाकार आहेत. धडक मराठीतील सैराट या सिनेमावर बेतला होता. तर धडक 2 तमिळमधील परियेरुम पेरुमल या सिनेमावर बेतला आहे. यामध्ये सामाजिक विषयवर भाष्य करणारी जातीव्यवस्थेतील दरी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. शाजिया इकबालने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.
हे सिनेमे वेगळ्या जॉनरचे असले तरी सिक्वेल या एकाच कॅटगरीमधील आहेत. एक युजर म्हणते, मी हे दोन्ही सिनेमे पाहिले आहेत. एक सामाजिक विषयाला हात घालतो तर दूसरा निरर्थक कॉमेडी आहे. दोन्हीचे संगीतही फारसे प्रभावित करणारे नाही.
एक जण म्हणतो, सन ऑफ सरदार 2च्या मेकर्सनी सगळे काही पटकथेवर सोडून दिले आहे तर धडक 2 मध्ये धर्मा प्रोडक्शन मेलेल्या घोड्याला जिवंत करण्याच्या प्रयत्नात आहेत.
नवनीत नावाचा युजर म्हणतो हे दोन्ही सिनेमे हवी तशी हाइप निर्माण करण्यात अयशस्वी ठरले आहेत. त्यामुळे या दोन्ही सिनेमांवर त्याचा हवा तता प्रभाव पडलेला नाही. या दोन्हीच्या साधारण प्रभावाचे कारण सैय्यारा आणि महावतार नरसिंहा हे सिनेमे कारणीभूत असू शकतो.
तर काही जणांचे मत धडक 2 कडे झुकताना दिसत आहे. एक युजर म्हणतो, कमी स्क्रीन्स असूनही धडक 2 चा प्रभाव चांगला आहे. याउलट सन ऑफ सरदार 2ची चांगला बॅनर आणि तगडी स्टारकास्ट असूनही अपेक्षापेक्षा कमी प्रभाव आहे.
अनेकानी सन ऑफ सरदार 2 ला ओढून ताणून केलेली कॉमेडी म्हणत बोरिंग सिनेमा पाहिल्याचा रिव्यू नोंदवला आहे. तर धडक 2 ची प्रगती संथ असल्याचे एकजण म्हणतो आहे.