

२०१७ मध्ये बहन होगी 'तेरी या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान एका वादग्रस्त पोस्टरमुळे अभिनेता राजकुमार राव विरोधात तक्रार दाखल झाली होती. त्याची सुनावणी आज जालंधर कोर्टात झाली. अर्थात या सुनावणीसाठी अभिनेता स्वतः उपस्थित नव्हता. (Latest Entertainment News)
राजकुमार राव यांनी या प्रकरणाबाबत अधिक बोलताना सांगितले कि, २०१७मध्ये सिनेमातील भगवान शंकराच्या पोस्टरबाबत विशिष्ट समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. या दरम्यान राजकुमार राव, श्रुती हसन, सिनेमाचे निर्माता आणि दिग्दर्शक यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. 295ए (धार्मिक भावना भडकवणे),१२० बी आणि आयटी ऍक्ट ६७ नुसार गुन्हा दाखल केला गेला होता. याशिवाय राजकुमारविरोधात अजामीनपात्र वॉरंटदेखील जारी करण्यात आले होते.
4 एप्रिल 2017 मध्ये अभिनेता राजकुमार रावला भगवान शंकराच्या रूपात आणि उत्तर प्रदेश पासिंग असलेल्या चांदीच्या बाईकवर बसवलेले दाखवले गेले होते. लांब जटा रुद्राक्ष माळा आणि ओपपायात चप्पल असा वेश केला होता?
यावर आक्षेप नोंदवून गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकुमार 28 जुलैला जालंधर कोर्टात हजर झाला होता.
या व्यक्तिरेखेबाबत बोलताना वकील म्हणतात, त्याने केवळ अभिनय केला होता. यामध्ये त्याने जागरण (कीर्तन) करणाऱ्या व्यक्तीची भूमिका साकारली होती. हा केवळ कलेचा आविष्कार होता. यात कोणाच्याही भावना दुखवण्याचा हेतु नव्हता.
तर याबाबत बोलताना राजकुमार म्हणतो, ‘बहन तेरी होगी’ला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्रही मिळाले आहे. ज्यावरून ही सिद्ध होते की हा सिनेमा लोकांना भावनांना ठेच पोहोचवत नाही.
या सिनेमाचे दिग्दर्शन अजय पन्नालालने केले आहे. आणि या सिनेमात राजकुमार राव आणि श्रुती हासन मुख्य भूमिकेत होते.