image of Son of Sardar 2
Son of Sardar 2 Ajay Devgn co actress Roshni WaliyaInstagram

Son of Sardar 2 | टीव्ही ते बिग स्क्रिन प्रवास करणारी कोण आहे रोशनी वालिया? अजय देवगनच्या को-ॲक्ट्रेसची जोरदार चर्चा

Son of Sardar 2 actress Roshni Waliya | कोण आहे अजय देवगनची सहकलाकार रोशनी वालिया?
Published on

who is Son of Sardar 2 actress Roshni Waliya

मुंबई - अजय देवगनचा चित्रपट सन ऑफ सरदार २ (Son of Sardar 2) चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. यामध्ये अजय देवगन आणि मृणाल ठाकुर मुख्य भूमिकेत आहेत. त्याचबरोबर एक अभिनेत्री आहे, जिने टीव्हीवरील अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ती अभिनेत्री आहे- रोशनी वालिया. सन ऑफ सरदार २ चित्रपटातील या अभिनेत्रीची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. टीव्ही ते बिग स्क्रिन तिचा प्रवास कसा घडला?

२० नोव्हेबर, २००१ रोजी रोशनीचा जन्म झाला. तिने वयाच्या ७ वया वर्षी अभिनय सुरु केला होता. तिने टीव्हीवरील अनेक प्रसिद्ध टीव्ही शोजमध्ये काम केलं आहे.

कोण आहे 'सन ऑफ सरदार-२'ची सबा?

रोशनी वालियाचे सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोईंग आहे. तिचा जन्म उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये झाला. त्यानंतर ती आपल्या आई आणि बहिणीसोबत मुंबईत आली होती. सध्या ती आपल्या आई आणि बहिणीसोबत मुंबईतच राहते.

image of Son of Sardar 2
John Abraham Tehran Trailer | 'काय तो तो देशभक्त होता की देशद्रोही?', जॉन अब्राहमचा धमाकेदार ट्रेलर पाहाच!

रोशनीने वयाच्या ७ व्या वर्षी जाहिरातीतून करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर २०१२ मध्ये तिने शो 'मैं लक्ष्मी तेरे आंगन की' मध्ये काम केलं. अनेक प्रसिद्ध मालिकेत तिने काम केलं आहे. २०१३ मध्ये तिने हॉरर टीव्ही शो 'खौफ बिगिन्स' मध्ये मैत्रीची भूमिका साकारली होती. तिला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली ती भारत का वीर पुत्र- महाराणा प्रताप या मालिकेतून. या मालिकेताल भूमिकेने तिला खास जागा मिळवून दिली.

image of Son of Sardar 2
Dhadak 2 | रोमँटिक थ्रीलरमध्ये तृप्ती डिमरीचा जलवा; 'सैयारा’चा बरोबरी करू शकणार 'धडक-२'?

२०१५ मध्ये रोशनीने २०१९ मध्ये 'तारा फ्रॉम सतारा'मध्ये अभिनय केला. इतकचं नाही तर 'मछली जल की रानी है' आणि 'फिरंगी' यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. शिवाय, वेब शो आणि म्युझिक व्हिडिओमध्ये रोशनी वालिया दिसली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news