

Son Of Sardaar 2 Box Office Collection
मुंबई - 'सन ऑफ सरदार २' सोबत आज आणखी एक सिक्वेल 'धडक २' प्रदर्शित झाला आहे. शुक्रवारी अजय देवगनने 'सैयारा' पेक्षा कमी कमाई केली. पण बॉक्स ऑफिसवर 'महावतार नरसिंहा' सर्व चित्रपटांवर वर्चस्व गाजवत आहे. 'सन ऑफ सरदार' चा पहिला भाग २०१२ मध्ये चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला होता. आता दुसऱ्या भागात अजय देवगनसोबत अभिनेत्री मृणाल ठाकुर मुख्य भूमिकेत आहे. भोजपुरी सुपरस्टार रवि किशन देखील मुख्य भूमिकेत आहे. 'सन ऑफ सरदार २' सोबत 'धडक २' देखील चित्रपटगृहात रिलीज झालाय. पाहुया पहिल्या दिवसाचे आकडे काय म्हणताहेत?
अजय देवगनचा 'सन ऑफ सरदार २' ने शुक्रवारी म्हणजेच १ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात रिलीज झालाय. या दरम्यान अजयचा चित्रपट पहिल्या दिवशीचे आकडे समोर आले आहेत.
'सन ऑफ सरदार २' सोबत सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरीचा चित्रपट 'धडक २' देखील चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. अहान पांडेचा 'सैयारा' पहिल्या दिवशीपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. इतकेच नाही तर दोन आठवड्यात 'वॉर २' देखील रिलीज होणार आहे. याची चर्चा आधीपासून रंगलीय. 'वॉर २' मध्ये ज्युनियर एनटीआर, कियारा आडवाणी आणि ऋतिक रोशन मुख्य भूमिकेत आहे. अयान मुखर्जी चित्रपट दिग्दर्शित करत आहेत. त्यामुळे तगडी स्पर्धा पाहायला मिळणार आहे.
अजय देवगनचा 'सन ऑफ सरदार २' च्या पहिल्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे. रिपोर्टनुसार, 'सन ऑफ सरदार २' चे ओपनिंग डे कलेक्शन शुक्रवारपर्यंत ६.७४ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. 'धडक २'ने ओपनिंग डे ला ३.३५ कोटी रुपये कमावले आहेत. 'सन ऑफ सरदार २' चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगमध्ये २८,००० तिकिटे विकली गेली. 'धडक' चित्रपटाची १८,००० तिकिटे विकली गेली.
'सन ऑफ सरदार २' हा चित्रपट सुमारे २५०० ते ३००० स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे. तर रिपोर्टनुसार, 'धडक २'ने शुक्रवारी रात्री ९ वाजेपर्यंत अनुक्रमे ५.३९ कोटी आणि १.७२ कोटी रुपये कलेक्शन केले आहे. दरम्यान, 'महावतार नरसिंह' चित्रपटाने ८ व्या दिवशी म्हणजे शुक्रवार, १ ऑगस्ट रोजी त्याने ११.५७ कोटी रुपये कमावले आहेत.