.jpg?rect=0%2C0%2C1080%2C608&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C1080%2C608&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क - चित्रपट “तुम्बाड” २०१८ मध्ये रिलीज झाला होता, तो पुन्हा १३ सप्टेंबर, २०२४ रोजी चित्रपटगृहात वापसी करत आहे. या री-रिलीजमुळे फॅन्स आणि नवे प्रेक्षक “तुंबाड”चे भीतीदायक जग पुन्हा अनुभवायला तयार राहा.
निर्मात्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या नव्या पोस्टरमध्ये तुंबाडचे एक नवे पोस्टर रिलीज केले आहे. यामध्ये नायक विनायक राव (अभिनेता सोहम शाह) आपल्या छोट्या मुलासोबत हातात कंदील घेऊन जाताना दिसतो आहे. भयावह रात्री, चेहऱ्यावर भीती असे पोस्टरमध्ये चित्रप रेखाटण्यात आले आहे. पोस्टरमध्ये भीतीदायक प्रतिमा, एक खोल सावलीचा बास होतो, लपलेल्या खजान्याच्या शोधात ही पात्रे दिसत आहेत. दोन्ही पात्र एका धोकादायक प्रवासावर आहेत.
पोस्टर सोबत निर्मात्यांने टॅगलाईन दिलं आहे-''चित्रपटगृहात १३ सप्टेंबर, २०२४ रोजी घ्या अनुभव”, याप्रकारे मोठ्या पडद्यावर एक अविस्मरणीय अनुभव येण्याचे वचन आहे.''
तुम्बाड, राही अनिल बर्वेने दिग्दर्शित केलं आहे. आनंद गांधी यांनी क्रिएटिव्ह दिग्दर्शकाच्या रूपात मार्गदर्शन केलं. आदेश प्रसादने सह-दिग्दर्शन केले आहे. मितेश शाह, प्रसाद, बर्वे आणि गांधीद्वारा लिखित, चित्रपटाची निर्मिती सोहम शाह, आनंद एल राय, मुकेश शाह आणि अमिता शाहने केली होती. या चित्रपटात ज्योती मालशे आणि अनीता दाते-केळकर दिसले होते.