पुढारी ऑनलाईन डेस्क : करीना कपूर खान स्टारर “द बकिंघम मर्डर्स”चा रोमांचक टीजर जारी झाल्यानंतर फॅन्सची उत्सुकता आणखी वाढली आहे. टीजरने रहस्य आणि सस्पेंसच्या दुनियेत एक छोटीशी झलक दाखवली आहे. त्याआधी फर्स्ट सॉन्ग, “साडा प्यार टूट गया” रिलीज झाला होता. आता चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेट समोर आली आहे.
करीना कपूरच्या “द बकिंघम मर्डर्स” ३ सप्टेंबर, २०२४ रोजी रिलीज केला जाईल. “द बकिंघम मर्डर्स” ची पहिली निर्माती असलेला चित्रपट आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन हंसल मेहताने केले आहे. व्हिडिओ सॉन्गमध्ये करीना कपूर एका वेगल्या अंदाजात दिसत आहे. साडा प्यार टूट गयाचे म्युझिक विक्की मार्लेने केले आहे.२० ऑगस्ट, २०२४ रोजी द बकिंघम मर्डर्सचा टीजर रिलीज करण्यात आला होता. द बकिंघम मर्डर्स ऑक्टोबरमध्ये नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये आयोजित २०२३ मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. हा चित्रपट हंसल मेहतासोबत करीना कपूरचा पहिला चित्रपट आहे.
बकिंघम मर्डर्स १३ सप्टेंबर, २०२४ रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. ऐश टंडन, रणवीर बरार आणि कीथ एलन सह अन्य कलाकार यामध्ये असतील. असीम अरोरा, राघव राज कक्कड, कश्यप कपूर लिखित हा चित्रपट एकता कपूर आणि शोभा कपूरने प्रोड्यूस केली आहे.