

Aamir Khan-Genelia Sitaare Zameen Par Title Track released
मुंबई : सितारे जमीन पर चित्रपटाचे खूप सुंदर टायटल ट्रॅक रिलीज झाले आहे. एक गोड म्युझिक सोबत तुमच्या कलाकारांची मेहनत यामध्ये दिसते. या गाण्यात आमिर खानची संपूर्ण टीम बास्केटबॉल खेळताना दिसत आहे. गाणे शंकर एहसान लॉय यांनी कम्पोज केलं आहे. सिद्धार्थ महादेवन, शंकर महादेवन आणि दिव्या कुमारने आवाज दिला आहे.
आमिर खान प्रोडक्शनच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्याने म्हटलंय - Zor lagaake, jaan ladhaake, bolna... #SitaareZameenPar Title track is out now! #SitaareZameenPar Song out now.
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आता प्रसिद्ध दिग्दर्शक लोकेश कानगराज यांच्या चित्रपटात काम करणार आहे. चित्रपटाचे शूटिंग २०२६ च्या मध्यमध्ये सुरू होईल. याची पुष्टी स्वत: आमिर खानने केलीय. रिपोर्टनुसार, हा चित्रपट सुपरहीरोवर आधारित असेल.