पुढारी ऑनलाईन डेस्क
'बेबी डॉल' फेम गायिका कनिका कपूर आता दुसर्यांदा लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. मे मध्ये ती गौतम नावाच्या एका 'एनआरआय' उद्योगपतीशी लग्न करणार आहे. कनिकाने वयाच्या अठराव्या वर्षी 'एनआरआय' उद्योगपती राज चंडोकशी लग्न केले होते. त्यांना आयाना, समारा आणि युवराज अशी तीन अपत्ये आहेत. 1997 मध्ये लग्न झाल्यावर ती लंडनमध्ये स्थायिक झाली होती. 2012 मध्ये तिने राजपासून घटस्फोट घेतला. त्यानंतर ती गायनातील करिअर करण्यासाठी मुंबईत आली. 'जुगनी जी' या गाण्यासाठी तिने पहिल्यांदाच आवाज दिला.'चितियां कलाईयां', 'देसी लूक'सारखी तिची अनेक गाणी हिट झाली आहेत.