मैदानात उतरणार 'सिकंदर', ॲक्शनने भरपूर सलमानच्या चित्रपटाचा ट्रेलर येणार उद्या

Sikandar Trailer | मैदानात उतरणार 'सिकंदर', ॲक्शनने भरपूर सलमानच्या चित्रपटाचा ट्रेलर येणार उद्या
 Sikandar Trailer release tomorrow
'सिकंदर' चित्रपटाच्या ट्रेलरची तारीख समोर आली आहे x account
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - सलमान खानने चाहत्यांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. या चित्रपटाचा ॲक्शनने भरलेला ट्रेलर येत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. सिकंदर चित्रपटातील अनेक गाणी देखील रिलीज झाली आहेत. आता भाईजानने स्वतः रिलीज डेटचे अपडेट्स शेअर केले आहे आणि त्याची तारीख समोर आणली आहे. आता चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी फक्त एक आठवडा उरला आहे.

सलमान खानचा 'सिकंदर' चित्रपट चित्रपटगृहात दाखल होण्यासाठी सज्ज झाला असून यामध्ये मुख्य भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्नाही दिसणार आहे. सीबीएफसीनेही ॲक्शनने भरलेल्या या चित्रपटाला हिरवा कंदील दिला असून ट्रेलरची माहितीही समोर आली आहे.

यादिवशी सिकंदरचा ट्रेलर होणार रिलीज

चित्रपटाला CBFC ने UA 13+ प्रमाणपत्र दिले आहे, याचा अर्थ सर्व वयोगटातील चाहते हा धमाकेदार ड्रामा चित्रपट पाहू शकतात. सलमान खानने चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना खुलासा केला आहे की, रविवारी म्हणजेच २३ मार्च, २०२५ रोजी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हे पोस्टर शेअर करताना त्याने लिहिले की, "सिकंदरचा ट्रेलर २३ मार्च रोजी रिलीज होणार आहे. सिकंदर ३० मार्च २०२५ रोजी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news