Ranbir Kapoor | Love And War च्या शूटिंगपूर्वी रणबीरचे एअर फोर्ससोबत प्रशिक्षण, पहिला लूक आला समोर

Ranbir Kapoor | ‘लव्ह अँड वॉर’ तयारी, रणबीरचे एअरफोर्स ट्रेनिंग
Ranbir Kapoor
Ranbir Kapoor new look from film Love And Warx account
Published on
Updated on
Summary

‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटासाठी रणबीर कपूरने भारतीय वायुदलासोबत विशेष प्रशिक्षण घेतले असून त्याचा पहिला लूक सोशल मीडियावर समोर आला आहे. एअरफोर्स अधिकाऱ्यांची भाषा, शिस्त आणि स्टाइल आत्मसात करण्यासाठी त्याने मोठी मेहनत घेतली आहे.

Ranbir Kapoor new look from film Love And War

मुंबई - विक्की कौशल आणि रणीबीर कपूर स्टारर लव्ह अँड वॉरची सध्या प्रचंड चर्चा आहे. आता संजय लीला भन्साळींच्या बहुप्रतीक्षित चित्रपटातील रणबीर कपूरचा नवा लूक समोर आला आहे. शूटिंग पूर्वी रणबीर आणि विकी कौशलने एअर फोर्स सोबत प्रशिक्षण घेतले. यावेळी फ़ॅन्सना रणबीर कपूर आणि विक्की कौशलला जवळून पाहण्याची संधी मिळाली.

Ranbir Kapoor
Kis Kisko Pyaar Karoon 2 Trailer | हास्याची बरसात! 'किस किसको प्यार करूं २' चा ट्रेलर रिलीज, कपिल शर्माचा व्हिडिओ पाहाच
image of vicky kaushal
vicky kaushal Instagram

एक्स अकाऊंटवर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विकी आणि रणबीर दोघेजण एअर फोर्सचा युनिफॉर्म परिधान केलेल दिसतात. एका फ़ायटर जेट समोर पोज़ देताना दिसताहेत.

करारी मिशा, एविएशन-स्टाईल सनग्लासेस आणि एकसारखे पोझ देताना दोघे दिसताहेत. सोशल मीडियावर लिहिण्यात आलंय की, रणबीर कपूर आणि विक्की कौशलने संजय लीला भन्साळीच्या लव्ह अँड वॉरसाठी अखेरच्या वेळेस मिग-२१ सोबत उड्डाण केले. हा एक ऐतिहासिक क्षण कॅप्चर करण्यात आल, जेव्हा हे प्रसिद्ध जेट आपले अखेरचे टेकऑफ करत होते.”

पोस्ट व्हायरल होताच लोकांनी फोटोतील विक्कीच्या वर्णावरून प्रतिक्रिया देणे सुरु केले. तर फॅन्सनी बचाव केला.

Ranbir Kapoor
Hema Malini Family Album | 'फोटोंचा प्रचंड संग्रह..पण उलगडताना मन गलबलून गेलं', 'ड्रीम गर्ल' एक्सवर परतली

एका युज़रने कॉमेंट केली की, “इंडियन्स आणि गोरी त्वचेला घेऊन त्याचे को लेकर उनका ऑब्सेशन...आपल्या सर्वात चांगल्या रुपात, इंडियन्स विसरतात की, आपण सर्व ब्राऊन आहोत, व्हाईट नाही.” आणखी एका युजरने कॉमेंट केलं, “मजेशीर गोष्ट ही की, विक्की रणबीरपेक्षा खूप हँडसम आहे.”

लव्ह अँड वॉर विषयी ...

लव्ह अँड वॉर, संजय लीला भन्साळी यांचा एपिक ड्रामा आहे. ज्यामध्ये रणबीर कपूर, विक्की कौशल आणि आलिया भट्टचा एक जबरदस्त लव्ह ट्रँगल असेल. युद्ध आणि रोमान्स शिवाय ॲक्शन थरार देखील चित्रपटाची शान असणार आहे. नुकताच या चित्रपटाच्या सेटवरून काही फोटो व्हायरल झाले होते. ज्यामध्ये रणबीर आणि आलिया रेट्रो लूकमध्ये दिसले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news