

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला ६ वर्षाहून अधिक काळ ओलांडला आहे. त्याच्या मृत्यूबद्दल आजदेखील प्रश्न उपस्थित होतात. आता पुन्हा एकदा सुशांतची बहिण श्वेता सिंह कीर्तिने सुशांतच्या मृत्यूबद्दल अनेक मोठे खुलासे केले आहेत.
बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची बहिण श्वेता सिंह कीर्तिने सांगितले की, सुशांतच्या मृत्यूनंतर आपल्या भावाची उपस्थिती, तो आपल्या जवळ आल्याचा अनुभव आला. एका यूट्यूब चॅनलशी झालेल्या बातचीतमध्ये श्वेताने म्हटले की, सुशांत गेल्यानंतर ड्रीम स्टेट आणि मेडिटेशनमध्ये तिने ह अनुभव केला. श्वेताच्या माहितीनुसार, पटनामध्ये जेव्हा सुशांतच्या अस्थी विसर्जनासाठी गेली होती, तेव्हा ती ज्या रुममध्ये झोपली होती, तिथे तिचा भाऊ सुशांत आल्याचा अनुभव झाला.
श्वेताने सांगितलं की, ‘त्या दिवशी रात्री तो माझ्याशी बोलण्यासाठी आला होता. त्याने जूटसारखे काहीतरी घातल होते. कुर्ता टाईप ड्रेसमध्ये येऊन त्याने मला आलिंगन दिलं. माझ्याशी खूप बोलला. माझे त्याला खूप प्रश्न होते - भाई, असं का केलंस, खूप काही विचारलं. त्याने मला सर्व काही समजावलं आणि ... शेवटी त्याने मला आलिंगन दिलं, किस केलं, तर त्याचा जो गंध होता, त्याचे जे श्वास होते, सर्व काही मी अनुभवलं.’
श्वेताने सांगितले की, सुशांतच्या मृत्यूच्या वेळी ती कॅलिफोर्नियामध्ये होती. ती म्हणाली, त्याची बातमी ऐकताच माझं शरीर सुन्न झालं होतं आणि मी माठमोठ्याने रडू लागले. कोविड-१९ च्या कारणाने ती भारतात येऊ शकली नाही.
धोनीने परिवाराशी संपर्क केलं नाही
सुशांत सिंह राजपूतने महेंद्र सिंह धोनीचा बायोपिक ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ मध्ये धोनीने भूमिका साकारली होती. दरम्यान, श्वेताने पॉडकास्टमध्ये म्हटले की, सुशांतच्या मृत्यूनंतर धोनीने परिवाराशी संपर्क केला नाही. कंगना रणौत आणि काही अन्य सेलेब्सने परिवाराशी संपर्क केला होता.
१४ जून २०२० रोजी सुशांतचा मृत्यू झाला
१४ जून, २०२० रोजी सुशांत सिंग राजपूत त्याच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. सुरुवातीला पोलिसांनी याला आत्महत्येचे प्रकरण म्हटले होते. तथापि, सोशल मीडियावर उपस्थित केलेले प्रश्न आणि पाटणा येथे सुशांतच्या कुटुंबाने दाखल केलेल्या एफआयआरनंतर, खून आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा दावा आणि आरोप समोर आले.