

बॉक्स ऑफिसवर एकीकडे बटवारा १९४७ ची चर्चा होत असताना मात्र दुसरीकडे इमराऩ हाशमीचा 'आवारापन २' चांगलाच चर्चेत आला आहे. आवारापन २ च्या ॲडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. इम्रान हाशमीच्या या चित्रपटाने रिलीजपूर्वीच बॉक्स ऑफिसवर मोठी सुरुवात केली आहे. नितीन कक्कर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात इम्रान हाशमी आणि दिशा पटानी प्रमुख भूमिकेत आहेत.
सध्या सुरू असलेल्या आगाऊ तिकीट विक्रीच्या आकडेवारीनुसार, असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, हा चित्रपट पहिल्याच दिवशी १५ ते २० कोटी रुपयांपर्यंत कमाई करू शकेल.
ॲडव्हान्स बुकीगमध्ये आवारपन बटवारा १९४७ वर भारी पडला आहे. बुधवार १२ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत देशातील प्रमुख मल्टिप्लेक्स साखळ्यांमध्ये 'आवारापन २'ची जवळपास ३५ हजार तिकिटे विकली गेली होती. ॲडव्हान्स बुकिंग पूर्ण होईपर्यंत हा आकडा सुमारे एक लाख तिकिटांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याआधी 'तेरे इश्क में'च्या सुमारे ७५ हजार तिकिटांच्या आगाऊ विक्रीलाही हा चित्रपट मागे टाकू शकतो. प्री-सेल्सच्या आकड्यांनुसार, इमरान हाशमीचा हा चित्रपट आतापर्यंत तीनपट अधिक पुढे आहे.
विशेष म्हणजे, सनी देओल आणि इमरान हाशमी यांच्यात तबबल १९ वर्षानंतर बॉक्स ऑफिसवर टक्कर होत आहे. २००७ मध्ये आवारापन आणि अपने हे चित्रपट आमने सामने होते. आवारापनचा मुख्य नायक शिवम पंडितची जादू चालली आणि आवारापन एक कल्ट क्लासिक चित्रपट ठरला.
आता आवरापन रिलीज नंतर पहिल्या तीन दिवसांत म्हणजेच ओपनिंग वीकेंडमध्ये ८० कोटी रुपयांचा आकडा गाठण्याची शक्यता आहे. विशेषतः दुसऱ्या दिवशी स्वातंत्र्यदिनाची सुट्टी असल्याने कमाईला त्याचा भरपूर फायदा होईल, असे म्हटले जात आहे.