

सेलिब्रिटी आणि त्यांचे फॅन्स हा एक चर्चेचा स्वतंत्र विषय होऊ शकेल. लाडक्या कलाकाराला भेटण्यासाठी कधी कधी त्यांचे फॅन्स स्वत:चा जीव धोक्यात घालायलाही मागे पुढे पाहत नाहीत.
कधी लाडक्या सेलिब्रिटीसाठी कोणी रक्ताने पत्र लिहत, तर कोणी त्याची एक झलक मिळावी म्हणून दिवसरात्र त्याच्या घराबाहेर ठाण मांडून बसते. (Latest Entertainment News)
आता एक विचित्र प्रकार समोर आला आहे. सुपरस्टार शाहरुख खानला भेटण्याचे स्वप्न अनेकजण पहात असतात.
पण एका एन्फ्लूएन्सरने हे स्वप्न अगदी वेगळ्या पद्धतीने खरे केले आहे. शुभम प्रजापत नावाचा सोशल मीडिया एन्फ्लूएन्सर झोमॅटो डिलिव्हरी बॉय बनून शाहरुखचा बंगला मन्नतमध्ये घुसला. हा सगळा प्रकार त्याने व्हीडियोमध्ये कैद केला आहे.
या व्हीडियोच्या सुरुवातीला शुभम मन्नतसमोर उभा राहून शाहरूखला भेटण्याची इच्छा व्यक्त करताना दिसतो आहे. तो गार्ड जवळ जातो. तेव्हा गार्ड त्याला हटकतो. यावर तो परत येतो. काही वेळाने त्याच्याजवळ एक डिलीव्हरी बॉय येतो. शुभम त्याच्याकडून डिलिव्हरी बॅग घेतो. शाहरुखच्या घरच्या सिक्युरिटीना कोल्ड कॉफी घरात डीलीव्हर करायची असल्याचेही सांगतो.
सिक्युरिटी गार्ड त्याला मेन गेटमधून न नेता मागच्या दाराने आत नेतात. शुभमला त्याचे स्वप्न पूर्ण होणार असे वाटताच असे काही घडते की जे अनपेक्षित असते.
तिथे असलेला दूसरा सिक्युरिटी गार्ड मात्र त्याला ऑर्डर करणाऱ्या व्यक्तीला कॉल करायला सांगतो. यावर मात्र शुभमकडे काहीच उत्तर नसते. यावर सिक्युरिटी गार्डच्या लक्षात येते की हा डिलिव्हरी बॉय नसून एक फॅन आहे. त्यानंतर तो शुभमला बाहेर नेतो. यावर नेटीझन्स मात्र त्याचे कौतुक करत आहेत. तू डोके तर पूर्ण लावलेस या शब्दांत काहीजण त्याचे कौतुक करताना दिसत आहेत.
शुभम मन्नतवर गेला आहे खरे, पण तिथे बांधकाम सुरू असल्याने शाहरुखचे कुटुंब दुसरीकडे शिफ्ट झाले आहे. शाहरुख आगामी किंग या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. विशेष म्हणजे त्याच्यासोबत त्याची लेक सुहानापण या सिनेमात दिसणार आहे.