Tarak Mehta ka ooltah chashma: तारक मेहता का उलटा चश्मा मालिकेतील नव्या कुटुंबाची ओळख समोर; दिसणार हे कलाकार

निर्माते असित मोदी यांनी एका नव्या कुटुंबालाच या मालिकेत आणले आहे
Tarak Mehta ka ooltah chashma
Tarak Mehta ka ooltah chashmaPudhari
Published on
Updated on

तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेत नवे चेहरे येत जात असतात. टीआरपीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी एकामागोमाग एक मालिका सोडून जाणारे कलाकार, सेटवर होणाऱ्या वादाच्या चर्चा, मालिकेत परत न येणारी दयाबेन या सगळ्या अडथळ्यांमध्ये मालिकेचे अस्तित्वच पणाला लागले होते. (Entertainement Latets News)

हे सगळे दूर करण्यासाठी निर्माते असित मोदी यांनी एका नव्या कुटुंबालाच या मालिकेत आणले आहे. या कुटुंबाच्या निमित्ताने आता मालिकेत 4 नवे चेहरे दिसणार आहेत. हे कलाकार कोण आहेत. त्यांच्या काय भूमिका काय असणार हे जाणून घेऊ.

या मालिकेत दिसणारे नवीन कलाकार

  • धरती भट्ट

  • कुलदीप गौर

  • अक्षान सहरावत

  • माही भद्रा

काय असणार आहेत यांची भूमिका

  • कुलदीप गौर : रतन बिंजोला

  • धरती भट : रुपा बिंजोला

  • अक्षान सहरावत, माही भद्रा: रतन आणि रुपाचे मुले

काय करणार या व्यक्तिरेखा

  • रतन बिंजोला या मालिकेत साडी विक्रेत्या दुकानदाराच्या भूमिकेत दिसणार आहे

  • रुपा बिंजोला गृहिणी असलेली रुपा एक सोशल मीडिया एन्फ्लूएन्सरही आहे.

टप्पूसेनानंतर पहिल्यांदाच मालिकेत लहान मुले

मालिकेतील प्रेक्षकांची लाडकी टप्पू सेना आता मोठी झाली आहे. त्यामुळे बिंजोला कुटुंबातील मुले यांच्यामुळे बऱ्याच वर्षांनी मालिकेत लहान मुले दिसणार आहेत.

याबाबत एका वृत्तपत्राशी बोलताना असित मोदी म्हणतात, 'वेळेनुसार गोकुलधाम सोसायटीमध्ये अनेक नवीन सदस्य जोडले गेले आहेत. या प्रत्येकाने मालिकेत आपल्या परीने एक चार्म जोडला आहे. गोकुलधाम कुटुंब सतत विस्तारत आहे.

आता धरती भट आणि कुलदीप गौरच्या नव्या राजस्थानी कुटुंबाचे स्वागत करूया.’

Tarak Mehta ka ooltah chashma
Box Office collection Day 5: वॉर 2 आणि कुलीला सोमवारचा फटका; कमाईमध्ये झाली इतकी घट

राजस्थानी कुटुंब का निवडले?

या भूमिकांसाठी अनेक कलाकारांनी ऑडिशन दिली आहे. किती महिन्यापासून ही कास्टिंग प्रोसेस सुरू आहे. त्यानंतर यांना निवडले गेले आहे. असित मोदी म्हणतात 'मला आशा आहे की हे कुटुंब आपला हटक फ्लेवर या मालिकेत जोडेल.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news