shubh vivah serial
shubh vivah serial

शुभविवाह मालिका : भूमी-आकाशने ४० फूट उंच मंदिरावर केला सीन

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'शुभविवाह' मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. या मालिकेत नुकताच एक प्रसंग चित्रित झाला. या सीनमध्ये मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नात आकाश चक्क मंदिराच्या कळसावर चढतो. आपला जीव धोक्यात घालून निरागस जीवाला वाचवण्याची आकाशची धडपड असते. आकाश धाडसाने कळसावर चढतो. याप्रसंगी भूमी येऊन आकाश आणि मांजरीचा जीव वाचवते. मालिकेत दाखवल्या गेलेल्या या प्रसंगाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. सिनेमामध्ये अशा पद्धतीचे स्टण्ट सीक्वेन्स आपण पाहत असतो. मात्र शुभविवाह मालिकेच्या संपूर्ण टीमने हे आव्हान स्वीकारत हा धाडसी प्रसंग पूर्ण केला.

खास बात म्हणजे हा सीन पूर्ण करणाऱ्या भूमी आणि आकाशचं म्हणजेच अभिनेत्री मधुरा देशपांडे आणि यशोमान आपटेचं विशेष कौतुक होत आहे. बॉडी डबल न वापरता या दोघांनीही हा सीन पूर्ण केला. अर्थातच हा सीन शूट करताना सर्वोतोपरी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. काही मिनिटांचा हा सीन कित्येक तास सुरु होता. दिग्दर्शक आणि फाईट मास्टरच्या मार्गदर्शनाखाली हा सीन पूर्ण करण्यात आला.

अभिनेता यशोमान आपटे आणि मधुरा देशपांडे या दोघांनीही अशा पद्धतीचा सीन पहिल्यांदाच केलाय. सुरुवातीला खूप भीती वाटत होती. मात्र टीमच्या सहकार्यामुळे आणि उत्तम नियोजनामुळे हा सीन पूर्ण करता आला, अशी भावना मधुरा आणि यशोमान यांनी व्यक्त केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news