

Shriya Pilgaonkar best performance in Mandala Murders
मुंबई - नेटफ्लिक्सवरील नवी सीरीज 'मंडला मर्डर्स' सध्या चर्चेत आहे. मर्डर्स आणि सस्पेंसने भरलेल्या ही सीरीज नेटफ्लिक्सवर नंबर वनवर ट्रेंडवर आहे. या सीरीजमध्ये वाणी कपूर, सुरवीन चावला आणि वैभव राज गुप्ता यासारखे कलाकार आहेत. पण सर्वाधिक चर्चा होतेय ती 'रुक्मिणी देवी'ची. ही भूमिका अभिनेत्री श्रिया पिळगावकरने साकारली आहे.
अभिनेत्री श्रिया पिळगावकरच्या अभिनयाला प्रेक्षक दाद देत आहेत. नेटफ्लिक्सवरील नवीन मालिका मंडला मर्डर्समधील तिच्या अभिनयाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल चाहत्यांनी आभार मानले आहेत. अभिनेत्री श्रिया पिळगावकरने नेटफ्लिक्सवरील मंडला मर्डर्स या नवीन मालिकेतील तिच्या अभिनयाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल चाहत्यांचे आभार मानले आहेत.
श्रियाने सायकॉलॉजिकल थ्रिलरमधील 'रुक्माणी' या भूमिकेबद्दल प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांबद्दल खुलासा केला. एका वृत्तसंस्थेशी बोलताना ती म्हणाली, "ज्यांनी मंडला मर्डर्स पाहिले आहे त्यांनी मालिकेतील माझ्या भूमिकेला चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. रुक्माणीला मिळालेल्या प्रेमाबद्दल मी खूप आभारी आहे. मी आता अधिक वैविध्यपूर्ण भूमिका करत आहे. मी आता चित्रपटांवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. लोकांना नंतर त्याबद्दल कळेल."
श्रियाचे वडील अभिनेते सचिन पिळगावकर यांनीही सोशल मीडियावर त्यांच्या मुलीच्या अभिनयाचे कौतुक केले.
"तुला मिळत असलेल्या प्रेमाबद्दल अभिनंदन @shriya. pilgaonkar. तू तुझ्या प्रत्येक भूमिकेला उंचावत आणि परिवर्तन करण्याची तुमची क्षमता खूप कौतुकास्पद आहे. मंडला मर्डर्समधील रुक्मिणीच्या तुझ्या मंत्रमुग्ध करणाऱ्या अभिनयाबद्दल आम्हाला तुझा खूप अभिमान आहे. तुझ्या इतर भूमिकांपेक्षा ही खूप वेगळी भूमिका आहे आणि तू हे सिद्ध केले की, काही दृश्यांसह एक अभिनेता चांगली छाप पाडू शकतो...तुला नेहमीच आशीर्वाद असो," नेटफ्लिक्स शो पाहताना सचिन पिळगावकर आणि आई सुप्रिया पिळगावकरने फोटोसोबत पोस्ट शेअर केली.
श्रिया पिळगावकरचा जन्म १९८९ मध्ये मुंबईत झाला. ती सचिन पिळगावकर - सुप्रिया पिळगावकर यांची कन्या आहे. तिला जपानी ट्रान्सलेटर बनायचं होतं. यासाठी तिने जापानी भाषा देखील शिकली. नंतर तिने समाजशास्त्रमधून पदवी देखील घेतली आणि फिल्ममेकिंग आणि अभिनयात करियर करण्याचा निर्णय घेतला. ती एक ट्रेंड स्विमर देखील होती.
श्रियाने अभिनयाची सुरुवात वयाच्या ५ व्या वर्षापासून केली होती. तिने टीव्ही शो 'तू तू मैं मैं' मध्ये एका मुलाची भूमिका साकारली होती. तिने मराठी चित्रपट 'एकुलती एक'मधून डेब्यू केलं होतं. हा चित्रपट सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शित केला होता. त्यानंतर ती 'इंटरनल अफेयर्स' आणि 'कॉमन पीपल' या नाटकांत देखील काम केलं.