Shraddha Kapoor | दीर्घ विश्रांतीनंतर ‘ईथा’च्या सेटवर दमदार कमबॅक, साकारतेय विठाबाई नारायणगावकर!

Shraddha Kapoor |दीर्घ विश्रांतीनंतर श्रद्धा पुन्हा 'ईथा'च्या सेटवर, लक्ष्मण उतेकरांच्या सिनेमात साकारतेय विठाबाई नारायणगावकर
Shraddha Kapoor
Shraddha Kapoor return on the eetha set instagram
Published on
Updated on
Summary

दीर्घ विश्रांतीनंतर श्रद्धा कपूर पुन्हा एकदा चित्रपटाच्या सेटवर परतली आहे. लक्ष्मण उतेकरांच्या ‘ईथा’ चित्रपटात ती विठाबाई नारायणगावकरांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

Shraddha Kapoor returns sets Laxman Utekar Eetha film toe injury

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर पाच आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा ईथाच्या सेटवर परतली आहे. काही काळापासून ती मोठ्या पडद्यापासून दूर होती, मात्र आता ‘ईथा’ या आगामी चित्रपटाच्या सेटवर परतल्यानंतर ती चर्चेत आलीय. लक्ष्मण उतेकर यांचा महत्त्वाचा चित्रपट विठाबाई नारायणगावकर यांच्या भूमिकेत ती दिसणार आहे. यासाठी प्रचंड मेहनत ती घेत आहे.

‘ईथा’ हा चित्रपट विठाबाई नारायणगावर यांच्या व्यक्तिरेखेवर आधारित असल्याचं सांगितलं जात आहे. विठाबाई नारायणगावकर ही भूमिका श्रद्धाच्या करिअरमधील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या भूमिकेसाठी श्रद्धाने विशेष तयारी केल्याची चर्चा आहे. दरम्यान, तिच्या पायाला दुखापत झाल्यानंतर तिने शूटिंगमधून ब्रेक घेतला होता. मुंबईतील मालाड येथील मार्वे बीचवर पुन्हा शूटिंग सुरु झाल्याचे म्हटले जात आहे.

शूटिंग वेळी दुखापत

नोव्हेंबर, २०२५ मध्ये शूटिंग करताना श्रद्धाच्या पायाच्या अंगठ्यात फ्रॅक्चर झाले होते. त्यानंतर तिने ब्रेक घेतला होता. आता मीडिया रिपोर्टनुसार, "चित्रपटाच्या टीमने मार्वे बीचवर एका गावाचे सेट तयार के आहे. श्रद्धाची प्रकृती ठिक होऊपर्यंत तो सेट तसाच ठेवण्यात आला होता. एक डान्सचे शूटिंग तिने सुरू केली असून ज्यामध्ये एका यात्रेचे सीन्स आहेत. जिथे यात्रेमध्ये एका स्टेजवर ती परफॉर्म करताना दिसणार आहे. हा डान्स वैभवी मर्चेंट कोरिओग्राफ करत आहे.''

Shraddha Kapoor
Border 2 Collection | बॉर्डर-२ ची सातव्या दिवशीही सुसाट ट्रेन, कमाईची घोडदौड सुरुच

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर पाच आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा ईथाच्या सेटवर परतली आहे. काही काळापासून ती मोठ्या पडद्यापासून दूर होती, मात्र आता ‘ईथा’ या आगामी चित्रपटाच्या सेटवर परतल्यानंतर ती चर्चेत आलीय. लक्ष्मण उतेकर यांचा महत्त्वाचा चित्रपट विठाबाई नारायणगावकर यांच्या भूमिकेत ती दिसणार आहे. यासाठी प्रचंड मेहनत ती घेत आहे.

‘ईथा’ हा चित्रपट विठाबाई नारायणगावर यांच्या व्यक्तिरेखेवर आधारित असल्याचं सांगितलं जात आहे. विठाबाई नारायणगावकर ही भूमिका श्रद्धाच्या करिअरमधील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या भूमिकेसाठी श्रद्धाने विशेष तयारी केल्याची चर्चा आहे. दरम्यान, तिच्या पायाला दुखापत झाल्यानंतर तिने शूटिंगमधून ब्रेक घेतला होता. मुंबईतील मालाड येथील मार्वे बीचवर पुन्हा शूटिंग सुरु झाल्याचे म्हटले जात आहे

Shraddha Kapoor
Bigg Boss Marathi-6 : 'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो, दीपाली सय्यद-राकेश बापट यांच्या मैत्रीत फूट?

काय असेल बायोपिक ईथामध्ये?

१९४० ते १९९० दरम्यानच्या घटनेवरील 'ईथा' चित्रपटाची कहाणी असेल. पंढरपूरमध्ये जन्मलेल्या कलाकार नारायणगावकर यांच्या बायोपिकमध्ये लोकप्रियता, सुरुवातीचे अनुभव, आर्थिक अडचणी असा प्रवास दाखवला जाईल. वयाच्या ४० तील हे शूटिंग फेब्रुवारीमध्ये पूर्ण होईल. त्यानंतर वयाच्या २० ते ३० या प्रवासातीस शूटिंग एप्रिलपर्यंत पूर्ण होईल, असे म्हटले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news