Bigg Boss Marathi-6 : 'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो, दीपाली सय्यद-राकेश बापट यांच्या मैत्रीत फूट?

Bigg Boss Marathi-6 : 'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो, दीपाली सय्यद-राकेश बापट यांच्या मैत्रीत फूट?
Bigg Boss Marathi-6
Bigg Boss Marathi-6 latest updates instagram
Published on
Updated on
Summary

दीपाली सय्यद घरातील समीकरणे कशी बदलते, कोणाशी मैत्री करते आणि कोणाशी मतभेद होतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. ती टॉप स्पर्धकांमध्ये स्थान मिळवेल का, की वादांमध्ये अडकून अडचणीत येईल, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Bigg Boss Marathi-6 latest updates Deepali sayed and Raqesh Bapat's friendship will break

राकेश बापट-दीपाली सय्यदच्या मैत्रीत फूट पडणार, असे दिसत आहे. कारण आहे-बिग बॉस मराठी ६ चा नवा प्रोमो. राधा पाटील घराबाहेर पडल्यानंतर आता घरात दीपाली सय्यदसह प्रभू शेळके, दिव्या शिंदे, रुचिता जामदार, सारग कारंडे, रोशन भजनकर, आयुष संजीव, विशाल कोटीयन, तन्वी कोलते असे एकूण १७ स्पर्धक आहेत.

Bigg Boss Marathi-6
Disha Patani O Romeo New Song | 'नुसता जाळ अन्‌ धूर' शाहीद-दिशाचे 'आशिकों की कॉलोनी' गाणे पाहाच!

घरामध्ये वेगवेगळे गेम खेळत असतानाच बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात पहिल्या आठवड्यापासूनच वादविवाद, हमरीतुमरी आणि अगदी छोट्या-छोट्या गोष्टींवरूनही वाद होताना दिसताहेत. काही स्पर्धकांमध्ये मतभेदही पाहायला मिळताहेत. एकीकडे राकेश बापट आणि अनुश्री मानेचा वाद शांत होत असातना दुसरीकडे दीपाली सय्यद आणि राकेश बापट यांच्या मैत्रीत दुरावा आलेला दिसतोय. आतापर्यंत दीपाली - राकेश यांची चांगली मैत्री होती, ती आता तुटणार असे दिसते.

Bigg Boss Marathi-6
Suraj Chavan Ajit Pawar: मित्रांनो माझा देव चोरला, आई- आप्पानंतर अजितदादाच; सूरज चव्हाणची पोस्ट

नवा ग्रुप तयार?

आता घरात एक ग्रुपदेखील तयार झाल्याचे दिसते. ज्यामध्ये विशाल कोटियन, रुचिता जामदार, अनुश्री मानेसह अन्य स्पर्धक आहेत. आता नवा खेळ कोणती गेम पालटणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

दीपालीची इन्स्टा पोस्ट व्हायरल

दरम्यान, दीपालीने इन्स्टाग्रामवर एक इन्स्टा पोस्ट लिहिलीय. त्यामध्ये म्हटलंय- ''मी जरी गेम खेळत असले, तरीही घरातील सदस्यांची फेअर इन्व्हॉल्वमेंट लक्षात घेऊन त्यांना सपोर्ट करणं, हेच माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. या आठवड्यात पुन्हा एकदा नॉमिनेट झाले आहे. पण, माझा गेम तुम्हाला आवडत असेल तर, मला vote देऊन सेफ करण्याची संधी आता तुमच्याजवळ आहे.''

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news