

मुंबई - शिट्टी वाजली रे या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा २ आणि ३ ऑगस्टला जल्लोषात रंगणार आहे. स्टार प्रवाहवर हा लोकप्रिय कार्यक्रमाच्या महाअंतिम सोहळ्यात सेलिब्रिटी जोडी धुमाकूळ घालायला येत आहेत. विशेष म्हणजे, निलेश साबळे आणि सिद्धार्थ जाधव सोहळ्यात हजेरी लावणार आहेत. तत्पुर्वी निलेश साबळे शिट्टी वाजली रेच्या प्रोमोमध्ये झळकला आङे. आता सोहळ्यात काय धम्माल उडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
निलेश साबळे म्हणाला की, 'या वाहिनीसोबतचा हा माझा पहिलाच प्रोजेक्ट आहे. स्टार प्रवाहचे अनेक कार्यक्रम मी पाहत आलो आहे. आता होऊ दे धिंगाणा आणि शिट्टी वाजली रे हे दोन्ही कार्यक्रम आवडीचे आहेत. इतक्या आपुलकीने आणि प्रेमाने जेव्हा या कार्यक्रमासाठी मला विचारण्यात आलं, तेव्हा नाही म्हणायचं काही कारणचं नव्हतं.
शिट्टी वाजली रे च्या मंचावरचा दिवस माझ्यासाठी अतिशय गंमतीदार ठरला. मला स्वयंपाक बनवता येत नाही पण माझ्यासोबत अभिनेत्री सुपर्णा श्याम होती. त्यामुळे तिच्या साथीने मी पदार्थ बनवू शकलो.'
शिट्टी वाजली रे चा महाअंतिम सोहळा रात्री ९ वाजता पाहता येणार आहे.
video - Nilesh Sabale Instagramवरून साभार