Stree 2 Collection : 'जवान'ला मागे टाकत श्रद्धाचा 'स्त्री-२' सहाशे कोटींच्या क्लबमध्ये

शाहरूखच्या 'जवान'ला मागे टाकत श्रद्धाचा 'स्त्री-२' सहाशे कोटींच्या क्लबमध्ये
Stree 2 Collection
शाहरूखच्या 'जवान'ला मागे टाकत श्रद्धाचा 'स्त्री-२' सहाशे कोटींच्या क्लबमध्ये Stree 2
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला 'स्त्री-२' ( Stree 2 ) या सिनेमा प्रेक्षकांना खूपच आवडल्याचे दिसून येत आहे. 'ओ स्त्री कल आना, ओ स्त्री रक्षा करना' अशा टॅगलाईनमुळे प्रसिद्ध झालेल्या 'स्त्री-२' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पहिल्या दिवसापासूनच या सिनेमाच्या कमाईत वाढ होत आहे. याचदरम्यान 'स्त्री-२' या सिनेमाच्या नावावर नवीन विक्रम मला गेला आहे. आता तर या चित्रपटाने बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानच्या ब्लॉकबस्टर 'जवान' ला मागे टाकले आहे. आणि 35 व्या दिवशी 'स्त्री-२' चित्रपट ६०० कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला आहे.

'स्त्री-२' हा सिनेमा १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता. सलग सुट्ट्या आणि प्रेक्षकांनी दिलेली दाद यामुळे 'स्त्री-२' या सिनेमाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. 'स्त्री-२' या सिनेमाने सर्वाधिक कमाई करणारा हिंदी सिनेमा म्हणून नवीन विक्रम स्वतःच्या नावावर नोंदवला आहे. यापूर्वी या यादीत शाहरूख खानचा 'जवान' या सिनेमान टॉपवर होता. आता 'स्त्री-२' हा सिनेमा 'जवान' या सिनेमाला मागे टाकत सर्वात अधिक कमाई करणारा हिंदी सिनेमा ठरला आहे.

ट्रेड ॲनालिस्ट तरण आदर्शच्या आकडेवारीनुसार, 'स्त्री २' चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात ३०७.८० कोटी रुपयांची भरघोष अशी कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यात १४५.८० कोटी रुपये, तिसऱ्या आठवड्यात ७२.८३ कोटी आणि चौथ्या आठवड्यात ३७.७५ कोटींची कमाई केली. यानंतर पाचव्या आढपड्यातही त्याने भरघोष कमाईची कसूर कमी केली नाही.

पाचव्या आढवड्यातील पाचव्या शुक्रवारी 'स्त्री २' ने ३.६० कोटी रुपये, पाचव्या शनिवारी ५.५५ कोटी रुपये, पाचव्या रविवारी ६.८५ कोटी रुपये, पाचव्या सोमवारी ३.१७ कोटी रुपये आणि पाचव्या मंगळवारी २.६५ कोटी रुपयांची भरघोष अशी कमाई केली. पाचव्या बुधवारी म्हणजे, चित्रपट रिलीजच्या ३५ दिवशी २ कोटी रुपये कमविले आहेत.

रिपोर्टच्या माहितीनुसार, आतापर्यत 'स्त्री २' चित्रपटाची ३५ दिवसांची एकूण कमाई ५८८.०० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तसेच आज गुरूवारची आकडेवारीही वाढण्याची शक्यता आहे. यामुळे हा चित्रपट लवकरच ६०० कोटींच्या क्लबमध्ये जाणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

'स्त्री-२' हा सिनेमा प्रदर्शित होऊन महिनाभरापेक्षा अधिक कालावधी झाला आहे, तरीही हा सिनेमा पाहण्यासाठी लोक सिनेमागृहात गर्दी करत आहेत. या सिनेमाने भारतात ५८६ कोटी रुपयांची बक्कळ कमाई केली आहे. या विक्रमामुळे 'स्त्री-२' या सिनेमाच्या टीमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

Stree 2 Collection
Stree 2 BO Collection - बॉक्स ऑफिसवर 'स्त्री २' ने 'रॉकी भाई' च्या केजीएफचा रेकॉर्ड

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news