Shiva | शिवाला मिळाली गाडी आणि अंगण साफ करायची शिक्षा!

शिवाला मिळाली गाडी आणि अंगण साफ करायची शिक्षा!
Shiva tv serial
शिवाला मिळाली गाडी आणि अंगण साफ शिक्षा करायची मिळाली instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - वस्तीत दहीहंडी साजरी करून शिवा आणि आशू घरी येतात. आशु, शिवाचा जीव वाचवून तिला घरी आणतो. पण घरी येताच सिताई शिवाला शिक्षा देते आणि घरातील गाड्या आणि अंगण स्वच्छ करायला लावते. शिवा वस्तीत जाऊन पुन्हा आपल्या शिवा कपड्यांमध्ये येऊन दहीहंडी फोडते म्हणून सिताई शिवाशी अबोला धरते. शिवाचे सीताईला मनवायचे सगळे प्रयत्न सुरु आहेत. शिवा डोसा बनवते आणि त्याच्यावर चटणीने सॉरी लिहते. सिताईला हे आवडत नाही. शिवा असे कपडे इथुन पुढें कधीचं घालणार नाही असे वचन सिताईला देते.

शिवा सिताई बरोबर भाजी मार्केट मध्ये जाते तेंव्हां तेथील व्यापारी गुंड हप्ता वसुली करत असल्याचं शिवाला कळत. शिवा सिताईच्या नजरेत न येता गुंडांना धडा शिकवते. वस्तीतील शाळेची पडझड झाल्याने शाळा बंद पडणार आहे हे जेव्हा शिवा कळत ती शाळेची मदत करायची ठरवते. शिवाला मदत करताना पाहून, आशू शिवाला मदत करायची ठरवतो. या सगळ्यामुळे शिवा आणि सिताईच्या नात्यात गोडवा येईल? 'शिवा' सोम ते शुक्र रात्री ९:०० वा. झी मराठीवर पाहता येईल.

Shiva tv serial
Aniruddhacharya | अनिरुद्धाचार्यांना Bigg Boss 18 चा कॉल, ऑफर केले कोटी रुपये?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news