.jpg?rect=0%2C0%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क - सोशल मीडियावर नेहमी ॲक्टिव्ह राहणारे अध्यात्मिक गुरु अनिरुद्धाचार्य यांनी सांगितलं की, 'बिग बॉस १८' चा ऑफर मिळाले होते. या रिॲलिटी शोसाठी त्यांना विचारण्यात आले. आता त्यांनी स्वत: कन्फर्म केलं आहे की, त्यांनी ही ऑफर नाकारली आहे. ते म्हणाले की, बिग बॉस १८ मध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना एक कॉल आला होता. कोटी रुपयांची ऑफर त्यांना मिळाली होती. पण त्यांनी ही ऑफर नाकारली. कारण त्यांची 'संस्कृती आणि मूल्यां'शी या शोचा मेळ बसत नव्हता.
एका रिपोर्टनुसार, एका सत्संगमध्ये ते म्हणाले, "बिग बॉसने मला बोलावलं आणि म्हटलं की, 'गुरुजी, या. कोटी रुपयांची ऑफर आहे. पण मी ही ऑफर नाकारली. मी ही ऑफर यासाठी स्वीकारली नाही कारण आमची संस्कृती आणि मूल्यांशी त्याचा मेळ बसत नाही. पैसे महत्त्वाचे नाही, माझी मूल्ये महत्त्वाची आहेत."
ते पुढे म्हणाले, "बिग बॉस एक असा शो आहे, जिथे..यासाठी मी तिथे जाणे योग्य नाही. म्हणून ती मी ऑफर नाकारली."
रिपोर्टनुसार, बिग बॉस १८ शो ऑक्टोबरपासून कलर्स टीव्हीवर सुरू होईल. त्याआधी एका व्लॉगमध्ये 'बिग बॉस ओटीटी ३' ची कंटेस्टेंट पायल मलिकने जाहीर केलं होतं की, कृतिकाला सलमान खानच्या 'बिग बॉस १८' मध्ये जागा देण्यात आली आहे."