

Shekhar Suman shocking reveals about 11 years old boy death
मुंबई : दिग्गज अभिनेता शेखर सुमनने आपल्या जीवनातील सर्वात वाईट काळाबद्दल सांगितले. त्यांचा मोठा मुलगा आयुषचा वयाच्या ११ वर्षी मृत्यू झाला होता. त्याला गंभीर आजार होता. शेखर यांनी त्या आठवणी जागवताना सांगितले की, जेव्हा त्यांच्या मुलाला गंभीर आजारानंतरदेखील एका दिग्दर्शकाने त्याला शूटिंगसाठी बोलावलं होतं. त्यांनी सांगितलं की, कशा प्रकारे आयुषने त्यांचा हात धरून ठेवला होता आणि तिथेच थांबण्यास सांगितले होते. या घटनेनंतर शेखर यांनी त्यांच्या घरातील सर्व धार्मिक मूर्ती हटवल्या होत्या.
शेखर सुमन यांनी आपल्या दिवंगत मुलाची आठवण करत एका एफएमला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आपल्या मुलाचा हात घट्ट पकडून जेव्हा एखाद्या चमत्कारासाठी प्रार्थना करत राहिले. आयुषने त्यांचा हात घट्ट पकडला होता आणि म्हणाला, 'बाबा, आज जाऊ नका, प्लीज.' शेखर म्हणाले, तो लवकरच परत येईल.
मुलाच्या मृत्यूनंतर शेखर सुमन यांना बसला होता धक्का आयुषच्या मृत्यूनंतर शेखर सुमन यांची भक्ती, आस्था डळमळली आणि त्यांनी आपल्या घरातील मंदिर बंद केलं. घरातील सर्व मूर्ती देखील हटवल्या. ते म्हणाले, अशा परमेश्वर विश्वास करू शकत नाही, ज्याने त्यांच्या निष्पाप मुलाला हिरावून घेऊन इतकं दु:खी केलं. शेखर म्हणाले की, आतादेखील ते धक्क्यातून पूर्णपणे सावरू शकलेले नाहीत. प्रत्येक दिवशी ते आयुष विषयी विचार करत राहतात.
शेखर सुमन म्हणाले, जेव्हा १९८९ मध्ये पहिल्यांदा समजलं की, त्यांचा मुलगा आयुष गंभीर आजारी आहे, तेव्हा त्यांना कशाप्रकारे संघर्षाचा सामना करावा लागला होता. त्यांना वाटले की, त्यांचं जग विस्कळीत झालं आहे. करिअर, लाईफ आणि कुटुंब सर्व एका धाग्याला लटकला आहे. त्यांनी आपल्या मुलाला कुशीत घेऊन अनगणित दिवस घालवले. हे दु:ख होतं की, त्यांच्याकडे वेळ घालवण्यासाठी खूप कमी काळ होता. डॉक्टरांनी ८ महिन्यांचा अंदाज लावला होता.