

Madhav Abhyankar will entry in Devmanus Madhla Adhyay serial
मुंबई : झी मराठीवर ‘देवमाणूस‘ मधला अध्याय’ या मालिकेचा प्रोमो प्रसारीत झाला आणि देवमाणूसच्या ह्या सीजनमध्ये काय नवीन पाहायला मिळणार? यात कोण कोण कलाकार असणार? याची सगळीकडे चर्चा सुरू झाली. तर मालिकेत परत एकदा आपल्याला देवमाणसाच्या मुख्य भूमिकेत अभिनेता किरण गायकवाड दिसणार आहे. त्याचबरोबर आधीच्या दोन सीजन गाजवणारी आणि तिच्या अस्सल गावरान भाषेने प्रेक्षकांच मन जिंकलेली सरू आज्जी म्हणजे रुक्मिणी सुतार सुद्धा असणार आहेत.
त्याच सोबत अजून एक सरप्राईझ म्हणजे ह्या मालिकेतून अण्णा नाईक म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर झी मराठीवर पुन्हा एकदा कमबॅक करणार आहेत. त्यामुळे किरण गायकवाड आणि माधव अभ्यंकर यांच्यातली जुगलबंदी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. तसेच या मालिकेत पहिल्या दोन सीझनप्रमाणेच गावातली अनेक नवीन इरसाल पात्र पाहायला मिळणार आहेत.
देवमाणूस मधला अध्याय, या मालिकेची कथा, पहिल्या आणि दुसऱ्या सीजनच्या मधली आहे. डॉक्टर आजीतकुमार देव कातळवाडीतून निघून गेल्यानंतर आणि तो परत येऊन त्याला फाशी झाली, त्याच्या मध्ये तो कुठे होता? काय करत होता ? तिथेही तो कसा पोहचला, त्याने कुणाला फसवल, माणसांच्या विश्वासाचा कसा गैरफायदा घेतला. हे सगळ आपल्याला देवमाणूस मधला अध्याय, या मालिकेत बघायला मिळणार आहे. देवमाणूस - मधला अध्याय २ जूनपासून दररोज रात्री १० वा. झी मराठीवर पाहा.
video- devmanusmadhlaadhyay_official insta वरून साभार