Sharvari Wagh |मुंज्या फेम शर्वरीने पटकावला IMDb स्टारमीटर पुरस्कार

शर्वरी वाघने पटकावला IMDb स्टारमीटर पुरस्कार
Sharvari Wagh |मुंज्या फेम शर्वरीने पटकावला IMDb स्टारमीटर पुरस्कार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : शर्वरीला (मुंज्या) IMDb “ब्रेकआउट स्टार” स्टारमीटर पुरस्कार मिळाला आहे. जगभरातून दर महिन्याला IMDb वर येणार्‍या २५ कोटींहून अधिक दर्शकांच्या वास्तविक पेज व्ह्यूजनुसार हे निर्धारित झाले आहे. IMDb ह्या चित्रपट, टीव्ही शोज आणि सेलिब्रिटीजवरील जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय माहिती स्रोताने मुंज्या मधील अभिनेत्री शर्वरीला IMDb “ब्रेकआउट स्टार” स्टारमीटर पुरस्कार घोषित केला आहे.

Sharvari Wagh |मुंज्या फेम शर्वरीने पटकावला IMDb स्टारमीटर पुरस्कार
Hocus-Focus Movie | थरार अनुभवायला तयार राहा; ‘हॉकस फोकस’ लवकरच

IMDb app वर प्रसिद्ध भारतीय सेलिब्रिटीजच्या यादीमध्ये आघाडीवर प्रदर्शन करत असलेल्या कलाकारांना ह्या पुरस्काराद्वारे मान्यता दिली जाते. शर्वरीने आदित्य सरपोतदारच्या भय- विनोदी कथा असलेल्या मुंज्यामध्ये काम केले आहे (ज्याचे IMDb रेटींग ७.२/१० आहे), आणि तिने सिद्धार्थ पी. मल्होत्राच्या ऐतिहासिक नाट्य असलेल्या महाराजमध्ये स्पेशल ॲपियरन्स भूमिका केली आहे.

Sharvari Wagh |मुंज्या फेम शर्वरीने पटकावला IMDb स्टारमीटर पुरस्कार
आश्रम उघडला आहे? शेख हसीना यांना आश्रय देण्यावरून Ketaki Chitale ची नाराजी

दोन्ही चित्रपट अगदी एका आठवड्यामध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर तिने सलग चार आठवड्यांसाठी “प्रसिद्ध भारतीय कलाकारांच्या” यादीमध्ये आघाडीचे स्थान पटकावले व टिकवून ठेवले. तिच्या आधीच्या भूमिकांमध्ये बंटी और बबली २ आणि द फोरगॉटन आर्मी- आज़ादी के लिए ह्यांचा समावेश आहे. येणाऱ्या काळामध्ये ती वेदामध्ये जॉन अब्राहमसोबत दिसेल व ती सध्या आलिया भट्ट सोबत अल्फाचे शूटिंग करत आहे.

Sharvari Wagh |मुंज्या फेम शर्वरीने पटकावला IMDb स्टारमीटर पुरस्कार
Antarpaat | गौतमी-क्षितिजच्या लग्नाचे सत्य अखेर जान्हवीसमोर

IMDb ला मन:पूर्वक धन्यवाद. IMDb ‘ब्रेकआउट स्टार’ स्टारमीटर पुरस्कार मिळाल्याबद्दल मला विलक्षण आनंद झाला आहे. हे अविश्वसनीय आहे. गेल्या महिन्यात माझ्या अभिनयावर इतके प्रेम केल्याबद्दल व मला इतके प्रेम दिल्याबद्दल मी सर्व चाहते व दर्शकांची ऋणी आहे. मी अतिशय, अतिशय आभारी आहे.

शर्वरी वाघ

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news