Hocus-Focus Movie | थरार अनुभवायला तयार राहा; ‘हॉकस फोकस’ लवकरच

या दिवशी प्रदर्शित होणार ‘हॉकस फोकस’
Hocus-Focus Movie release tomorrow
हा चित्रपट प्रेक्षकांना एक नवीन अनुभव देण्यासाठी सज्ज आहेInstagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - वास्तविकतेवर आधारित थ्रिलर चित्रपट “हॉकस फोकस” ९ ऑगस्ट, २०२४ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याचा ट्रेलर इतका दमदार व भयानक आहे की, त्याच्या प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. निरनिराळे ट्विस्ट, फसवणूक आणि आश्चर्यकारक वळणांनी ओतप्रोत असा हा चित्रपट प्रेक्षकांना एक नवीन अनुभव देईल. (Hocus-Focus Movie)

Hocus-Focus Movie release tomorrow
आश्रम उघडला आहे? शेख हसीना यांना आश्रय देण्यावरून Ketaki Chitale ची नाराजी

थ्रिलर चित्रपट “हॉकस फोकस” पाहायला तयार राहा 

या चित्रपटाला ३१ आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. आकर्षक थ्रिलर चित्रपट “हॉकस फोकस” मध्ये भयंकर अशी वळणे आहेत की, ज्यामुळे कट कोण करत आहे, ह्याची सुई प्रत्येकावर येत आहे. चित्रपट “हॉकस फोकस” अनेक छुप्या कॅमेऱ्यांद्वारे एक कथा सांगत आहे ज्यात असा अनुभव येतो की ते एक बँक लुटण्यासंदर्भात आहे. या थ्रिलरमधील प्रत्येक वळणावर एक रहस्य आहे आणि वास्तविक चित्र उलगडण्याचा खेळ सुरू आहे.

Hocus-Focus Movie release tomorrow
Antarpaat | गौतमी-क्षितिजच्या लग्नाचे सत्य अखेर जान्हवीसमोर

एसओसी फिल्म्स आणि कौशल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली बनलेल्या 'हॉकस फोकस' चित्रपटाची निर्मिती आशीष रेगो, अजीत पेंडुरकर, सह निर्माता सतिंदर सिंह गहलोत, माधवी अष्टेकर , गणेश दिवेकर आणि लेखक - दिग्दर्शक पैरी डोडेजा आहेत. आग्रा येथे चित्रित झालेल्या या चित्रपटात सुची कुमार, सतींदर सिंग गेहलोत आणि सोना भंडारी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Hocus-Focus Movie release tomorrow
Shraddha Unfollows Rahul Modi| श्रद्धा कपूरने मित्र राहुल मोदीला केले अनफॉलो

"होकस फोकस" चित्रपटाची कथा एका अंधाऱ्या आणि रहस्यमय जगातली आहे. जिथे छुपे कॅमेरे लावलेले आहेत. जे प्रत्येक व्यक्तीवर नजर ठेवून आहे. ही घटना एक बँक वर धाड घालण्यासारखी दिसते. पण तशी नाही आहे. या कथेत आठ व्यक्ती आहेत, ज्यांचा स्वतःचा काही स्वार्थ आहे जेणेकरून त्यांनी ह्या कटामध्ये सहभागी होण्याचे ठरवले आहे. पण त्यांना माहित नाही आहे की, त्यांचा इथे फक्त वापर करून घेण्यात येत आहे. त्यांच्यावर कोणीतरी सतत लक्ष ठेवून आहे. क्राईम सीन फुटेजमध्ये चित्तथरारक घटना आणि एक भयानक सत्य सामोरे येत आहे. खऱ्या सूत्रधाराचे इरादे उघडकीस आल्यावर तो फसतो. अशा बऱ्याच थरारक घटना, रहस्य सर्वांसमोर येत जातात.

प्रत्येक गुन्ह्यातून दुसरा गुन्हा, नंतर तिसरा गुन्हा घडतो आणि सगळी पात्रे एका चक्रव्यूहात अडकतात. गूढ आणि साहसाने भरलेल्या प्रवासासाठी सज्ज व्हा, जिथे प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जात आहे आणि प्रत्येक विश्वासघात कॅमेरात कैद केला जात आहे.

दिग्दर्शक पैरी डोडेजा म्हणाले, ""होकस फोकस" चित्रपटाची कथा तुमच्या कल्पनेपेक्षा अधिक क्लिष्ट आहे. ८ लोक.. ८ हेतू.. आणि एक गुन्हा. फसवणुकीच्या जाळ्यात अडकण्याची ही कहाणी तुम्हाला तुमच्या सीटशी जखडून ठेवेल .” हॉकस फोकस हा चित्रपट ९ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news