Sharmila Tagore HBD : सासूच्या भीतीने शर्मिला टागोर यांना काढावी लागली हाेते बिकिनीचं होर्डींग

 Sharmila Tagore HBD : सासूच्या भीतीने शर्मिला टागोर यांना काढावी लागली हाेते बिकिनीचं होर्डींग

पुढारी ऑनलाईन डेस्क :   अभिनेता सैफ अली खान याची आई आणि अभिनेत्री सारा अली खान हिची आजी अशी आजच्‍या पिढीला ज्‍येष्‍ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांची ओळख आहे. मात्र ७० च्‍या दशकात त्‍यांनी रसिकांच्‍या मनावर राज्‍य केले. या दशकातील सुपरस्‍टार राजेश खन्‍ना बराेबर त्‍यांनी केलेले चित्रपट सुपरहिट ठरले हाेते. अल्‍पावधीत बाॅलीवूडमधील ख्‍यातनाम अभिनेत्री अशी त्‍यांची ओळख झाली. आज ( दि. ८) शर्मिला टागोर यांचा आज ७७ वा वाढदिवस. (Sharmila Tagore HBD) जाणून घेवूया त्‍यांच्‍या जीवनातील 'बिकिनी' होर्डींग किस्सा.

शर्मिला टागोर यांना सत्यजीत रे यांच्या अपूर संसार या चित्रपटाने खरी ओळख मिळाली. त्यांनी आपल्या कारकिर्दीत आराधना, अमर प्रेम, सफर, कश्मीर की कली, मौसम, तलाश, वक्त, फरार, आमने-सामने, चूपके-चुपके यासारखे सूपरहिट चित्रपट त्यांनी केले. या१९६५ मध्ये शर्मिला यांची ओळख क्रिकेटपटू  मंसूर अली खान पताैडी यांचीशी झाली.काही दिवसांनी मंसूर यांनी शर्मिला यांना भेट म्‍हणून फ्रिज दिला होता. आता फ्रीज ही वस्‍तू खूप काॅमन झाली आहे; मात्र त्‍याकाळी ही खूप मोठी गोष्ट होती. कालांतराने या दोघांच्या गाठीभेटी वाढत गेल्या. दोघांची मैत्री वाढत गेली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात रूपांतर झालं.

लग्नास विरोध

शर्मिला आणि मंसूर अली खान पताैडी यांनी काही चार वर्षे डेट केल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला. दोघे २७ डिसेंबर १९६८ रोजी विवाहबध्द झाले; पण यांच्या विवाहाला  मंसूर यांच्या घरातून  विरोध होता. मंसूर हे नवाब हाेते. त्‍यामुळे आपल्‍या मुलाने अभिनेत्रीशी लग्‍न करु नये, अशी त्‍यांची इच्‍छा हाेती.

शर्मिला यांनी बदलला धर्म

शर्मिला यांनी लग्नानंतर आपला धर्म बदलला होता. त्यांनी हिंदू धर्म बदलून मुस्लिम धर्मात प्रवेश केला होता. आपलं शर्मिला टागोर हे नाव बदलून आयशा सुल्ताना असं केले हाेते ; पण त्यांना आजही शर्मिला टागोर म्हणूनच ओळखल्या जातात. लग्नानंतर त्यांनी हातातील काही चित्रपट सोडले.

Sharmila Tagore HBD सासूच्या भितीने काढाव लागलं हाेते बिकिनी होर्डींग

शर्मिला टागोर या बॉलिवूडची पहिली अभिनेत्री हाेत्‍या ज्‍यांनी फिल्मफेयर मॅक्झिनसाठी बिकिनी फोटोशूट केले होते. त्यांनी हे फोटोशूट  एन ईवनिंग इस पॅरिस या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केले होते. मुंबईमध्ये सर्वत्र त्यांनी बिकिनीमधील होर्डींग लावले होते. याचदरम्यान मंसूर यांची आई मुंबईला येणार होत्या. हे होर्डींग त्यांनी पाहिलं तर आपलं लग्न मोडेल या भितीपोटी त्यांनी मुंबईमधील सर्व होर्डिंग काढून टाकले होते.

हेही पाहा : ब्रेक-अप झाल्यानंतर आपण आजारी का पडतो ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news