पुढारी ऑनलाईन डेस्क : एलन मस्क यांची उपग्रहामार्फत थेट ब्रॉडबँड इंटरनेट सेवा भारतातही उपलब्ध होणार आहे. एप्रिल २०२२ पासून ही सेवा भारतात मिळू शकणार आहे. पहिल्या वर्षी २ लाख टर्मिनल्स देण्याचा स्टार लिंक या कंपनीचे उद्दिष्ट आहे. तर भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) 'स्टारलिंक' या कंपनीला भारतात सेवा सुरू करण्यापूर्वी आवश्यक ते परवाने घेतल्याशिवाय कोणतीही फी घेता येणार नाही, अशी सक्त सूचना केलेली आहे.
स्टारलिंकची ही सेवा घेण्यासाठी पहिल्या वर्षी १ लाख ५८ हजार रुपये इतका खर्च येणार आहे. त्यात उपकरणासाठीचे ३७,४०० आणि प्रती महिना ७,४२५ रुपये इतक्या शुल्काचा समावेशही आहे. स्टार लिंकचे भारताचे संचालक संजय भार्गव यांनी कंपनीने भारतात चाचणीसाठी परवानगी मागितली असून १ जानेवारी २०२२ला सेवा सुरू करण्यासाठी परवाना मिळावा यासाठी अर्ज करणार आहोत, अशी माहिती दिली आहे.
उपग्रहाच्या माध्यामातून इंटरनेटसेवा देता येत असल्याने अगदी दुर्गम भागातही इंटरनेट पोहोचू शकणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे. १५०MBPS इतक्या वेगाने हे इंटरनेट उपलब्ध होणार आहे.
हेही वाचलं का?
पाहा व्हिडिओ :