‘शमशेरा’चा टीझर आला; 22 जुलैला रीलिज होणार

‘शमशेरा’चा टीझर आला; 22 जुलैला रीलिज होणार

Published on

पुढारी ऑनलाईन

रणबीर कपूरचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'शमशेरा'चा टीझर आणि सोबतच नवी रीलिज डेट अखेर घोषित करण्यात आली आहे. त्यानुसार आता 22 जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. चित्रपटात वाणी कपूर आणि संजय दत्त यांच्याही भूमिका आहेत. 'करम से डकैत, धरमसे आझाद' अशी या चित्रपटाची टॅग लाईन आहे. हा चित्रपट हिंदीसह तमीळ, तेलगूमध्येही प्रदर्शित होणार आहे. करण मल्होत्राद्वारा दिग्दर्शित या चित्रपटात स्वातंत्र्यापूर्वीची कहाणी असून, डाकूंचा इंग्रजांविरोधातील लढा दाखवला आहे. या चित्रपटात रणबीर कपूर बाप आणि मुलगा अशा दोन्ही रूपांत दिसणार आहे. चित्रपटात आशुतोष राणा, सौरभ शुक्ला आणि रोनित रॉय देखील आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vaani Kapoor (@_vaanikapoor_)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news