पुढारी ऑनलाईन डेस्क : शाहरूख खान ८ वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला आहे. त्याच्या सिनेकरिअरमध्ये आठ वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेता फिल्म फेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. २००७ ला त्याचा लंडनमध्ये मादाम तुसाद संग्रहालयात मेणाचा पुतळा उभा करण्यात आला. रोमँटिक चित्रपटांसोबतच त्याने काही खलनायक भूमिका साकारल्या आहेत. स्वदेस, देवदास, अशोका, मैं हू ना, कल हो ना हो, वीर जारा, माय नेम इज खान, चक दे इंडिया, ओम शांती ओन, हॅप्पी न्यू ईयर, दिलवाले, चेन्नई एक्सप्रेस, जब हॅरी मेट सेजल, पठान, जवान यासारखे गाजलेले असंख्य चित्रपट त्याच्या नावावर आहेत.
अधिक वाचा-
* शाहरुखचे वडील टान्सपोर्ट व्यवसायाशी संबंधित होते. शाहरुखने जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातून पदवी घेतली.
* हेमा मालिनी यांना त्यांच्या पहिला चित्रपट 'दिल आशना है'साठी नायक म्हणून शाहरुखची निवड केली होती.
* हेमा म्हणाल्या होत्या, 'फौजी बनवणार्यांना शाहरुख चांगला नट आहे, हे लगेचं कळत होतं. पण, तो एक दिवस देशाचा इतका मोठा स्टार बनेल, असं कुणालाही वाटलं नसेल.'
*'दिल आशना है'ची कथा शर्ली कॉनरॅन या लेखिकेच्या 'लेस' या गाजलेल्या कादंबरीवर आधारीत होती.
अधिक वाचा-
*या चित्रटासाठी हेमा यांनी डिंपल कपाडिया, अमृता सिंग, सोनू वालिया, दिव्या भारतीची निवड केली होती.
*दिवाना चित्रपटानंतर दिग्दर्शक अली अब्बास यांनी शाहरुखला त्यांच्या चित्रपटात घेतलं
*अली अब्बास यांना इंग्रजी कादंबरी 'ए किस बिफोर डेथ'वर एक चित्रपट काढायचा होता.
*१९९३ मध्ये 'बाजीगर' सुपरहिट ठरला. त्यामुळे इंडस्ट्रीत शाहरुखला वेगळी ओळख मिळाली.
*१९९३ मध्ये यश चोप्राचा 'डर', १९९५ मध्ये यश चोप्रा यांनी 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले.
*२००४मध्ये शाहरुख खानने 'रेड चिली एंटरटेनमेंट' कंपनीची निर्मिती केली. या बॅनरखाली 'मैं हू ना', 'पहेली,' 'ओम शांती ओम,' 'बिल्लू बार्बर,' 'चेन्नई एक्सप्रेस,' 'हॅप्पी न्यू इयर,' 'दिलवाले' यासारखे सुपरहिट चित्रपट आणले.
अधिक वाचा-