पुढारी ऑनलाईन डेस्क : हुरुन इंडियाने आज २९ ऑगस्ट रोजी देशातील सर्वात श्रीमंत लोकांची यादी जारी केली आहे. या यादीमध्ये बॉलीवूड 'बादशाह' शाहरुख खानची एन्ट्री झाली आहे. या यादीत बॉलीवूड अभिनेत्री जुही चावला, ऋतिक रोशन, अमिताभ बच्चन आणि करण जोहरच्या नावाचा समावेश देखील आहे. २०२४ हुरुन इंडिया रिच लिस्टने रेकॉर्ड तोडले आहेत. ज्यामध्ये भारताच्या श्रीमंत लोकांची संपत्तीत वाढ झालेली पाहायला मिळालीय. प्रथमच या यादीने १,५०० चा आकडा पार केला आहे. त्यामध्ये १,५३९ अशा व्यक्तींचा समावेश आहे, ज्यांची एकूण संपत्ती १,००० कोटी रुपयांहून अधिक आहे.
गुरुवारी, हुरुन इंडियाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर हुरुन इंडिया रिच २०२४ ची यादी जारी केली आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं- '२०२४ हुरुन इंडिया रिच लिस्ट लॉन्च. भारत जगातील सर्वात गतीने पुढे जाणारी आणि सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलीय, जी २०२४ मध्ये उल्लेखनीय ७ टक्के वृद्धी दराचा दावा करत आहे...'.
पुढे लिहिलंय-'२०२४ हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये केवळ सर्वात धनवान व्यक्तींची यादी नाही. तर हे एक भारतातील पिढी, उद्योग आणि क्षेत्रांमध्ये धनसंपत्तीतील एक आकर्षक स्नॅपशॉट विषयी देखील सांगते...'
शाहरुख खानने वयाच्या ५८ व्या वर्षी ७ हजार ३०० कोटी रुपयांच्या संपत्तीसोबत २०२४ हुरुन इंडिया रिच यादीत डेब्यू केला. शाहरुखच्या संपत्तीत आयपीएल चँपियन कोलकाता नाईट रायडर्स आणि प्रोडक्शन कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंटचा समावेश आहे. ट्विटरवर त्याचे ४४.१ मिलियन फॉलोअर्स आहेत.
यादीत एसआरकेनंतर अभिनेत्री जूही चावला हिने स्थान मिळवले. ती कोलकाता नाईट रायडर्सची को-ऑनर आहे. जूही चावलाची संपत्ती ४,६०० कोटी रुपये आहे. त्यामुळे ती सिल्व्हर स्क्रीनवरील दिग्गजांमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. ऋतिक रोशन २ हजार कोटी रुपयांच्या संपत्तीसोबत तिसऱ्या स्थानी आहे. ज्यामध्ये ॲथलेटिक ब्रँड, एचआरएक्सचे योगदान आहे. ऋतिक रोशन सोशल मीडिया फॉलोअर्समध्ये दुसऱ्या स्थानी आहे. त्याचे ३२.३ मिलियन ट्विटर फॉलोअर्स आहेत.