HBD Nagarjuna | नागार्जुनच्या बर्थडेला 'कुबेर'चे न्यू लूक पोस्टर रिलीज
पुढारी ऑनलाईन डेस्क : दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन आज २९ ऑगस्ट रोजी ६५ वा वाढदिवस साजरा करत आहे. या औचित्याने त्याने फॅन्सना सरप्राईज देत चित्रपट कुबेरमधून आपला नवा लूक पोस्टर रिलीज केला आहे.
साऊथ किंग नागार्जुनचा आगामी चित्रपट कुबेर आहे. या पोस्टरमध्ये तो सुंदर हसताना दिसत आहे. कुबेरच्या निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं- आम्ही नागार्जुन सरांचा वाढदिवस साजरा करत आहे. स्क्रीनवरील त्यांच्या प्रेझेंसने सर्वांना मंत्रमुग्ध होते. चित्रपट कुबेरमध्ये साऊथ अभिनेता धनुष मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत आहे.
धनुष-रश्मिकाची खास भूमिका
मागील महिन्यात धनुष यांच्या वाढदिनी निर्मात्यांनी त्याचा लूक पोस्टर रिलीज केला होता. ज्यामध्ये धनुषचा चेहरा दाखवण्यात आला. फाटलेले आणि मळलेले कपडे, लांब दाढी-मिशामध्ये धनुषचा लूक होता. या पोस्टरवरून अंदाज लावू शकतो की, धनुष एका गरीब व्यक्तीची भूमिका करत आहे. चित्रपटामध्ये रश्मिका मंदानाचादेखील खास भूमिका आहे. तिचा लूकदेखील निर्मात्यांनी आधी शेअर केला आहे. त्या लूकमध्ये एका खड्ड्यातून पैसांनी भरलेला बॅग काढताना दिसली होती.
कधी रिलीज होणार कुबेर चित्रपट
धनुष, नागार्जुन आणि रश्मिका स्टारर कुबेर डिसेंबर, २०२४ रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट शेखर कम्मुलाने दिग्दर्शित केला आहे. तमिळ, तेलुगु , हिंदीमध्ये एकत्रच शूट केलं जात आहे.