Sarzameen Teaser | 'सरजमीन'चा फर्स्ट लुक; पृथ्वीराज सुकुमारन, काजोल, इब्राहिम अली थरारक कथेत एकत्र
kajol starrer Sarzameen Teaser released
मुंबई - दिग्दर्शक कयोझे इराणी आणि धर्मा प्रोडक्शन्स निर्मित सरजमीन २५ जुलै २०२५ रोजी जिओ हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. यामध्ये काजोल, इब्राहिम अली खान, पृथ्वीराज सुकुमारन यांच्या भूमिका आहेत. आता निर्मात्यांनी टीजर जारी केला असून फर्स्ट लूकदेखील शेअर केला आहे. दमदार टीजर पाहायला मिळत असून पृथ्वीराज सुकुमारन एका सैनिकाच्या भूमिकेत आहे तर त्याच्या पत्नीच्या भूमिकेत आहे काजोल. तसेच इब्राहिम अली खानचा लूक देखील दमदार आहे.
‘सरजमीन’ भावनिक थरारपट आहे. सिनेमाची पार्श्वभूमी अस्थिर होत चाललेल्या काश्मीरमध्ये आहे. पृथ्वीराज सुकुमारनने साकारलेली विजय मेनन भूमिका एक शूर आणि कर्तव्यनिष्ठ आर्मी ऑफिसरची आहे, ज्याने देशासाठी अनेक बलिदानं दिली आहेत.
काजोल मीराची भूमिका साकारतेय. एक निश्चयी पत्नी आणि आई, जी तिचं कुटुंब जोडून ठेवण्यासाठी लढते आहे.
हरमनच्या भूमिकेत इब्राहिम अली खान आहे.
या चित्रपटाबद्दल निर्माता करण जोहर म्हणाला, "सरझमीन ही केवळ ड्युटीबद्दलची कथा नाही, ती आपल्या आयुष्यातील कठीण निर्णयांची आणि मूल्यांवर कायम राहण्याची गोष्ट आहे. हा चित्रपट मनाला भिडणारा आणि काळाच्या आरशासारखा आहे. आम्ही जिओहॉटस्टारसोबत पुन्हा एकदा अशी कथा प्रेक्षकांसमोर आणत असल्याचा आनंद आहे."
दिग्दर्शक कयोझे इराणी म्हणाले, "सरजमीन हा माझं पहिला फिचर चित्रपट असल्याने माझ्या मनात याचं खास स्थान आहे. ही एक भावनिक आणि तीव्र कथा आहे, जी सांगताना मी भाग्यवान वाटतो."

