

new twist in Lakshmi Niwas tv serial
मुंबई - 'लक्ष्मी निवास' मालिकेत सध्या खूप घडामोडी घडताना दिसत आहेत. भावना- सिद्धूचा लग्न सोहळा उरकल्यांनंतर गाडेपाटीलांच्या घरात भावनाच्या गृहप्रवेशची तयारी सुरु होते. गृहप्रवेशाच्या वेळी भावना आनंदीसोबतच घरात पाऊल टाकण्याचा ठाम निर्णय घेते. पण रेणुका तिच्या विरोधात उभी आहे. सिद्धू भावनाला दिलेला शब्द पाळतो आणि तिच्या सोबत खंबीरपणे उभा राहतो. इकडे दळवी कुटुंबात तणाव वाढतो जेव्हा संतोष आर्थिक काटकसर करत सर्वांवर टीका करतो.
लक्ष्मी आणि श्रीनिवास कमवत नसल्यावरून त्यांना टोमणे ऐकावे लागतात. पुढे रूमच्या वाटणीवरूनही घरात वाद निर्माण होतो. गाडेपाटील आजी सार्वजनिक कार्यक्रमात भावनाचा अपमान करते. तेव्हा सिद्धू तिच्या बाजूने उभा राहतो. तर दुसरीकडे आपल्या जानूसाठी, जयंत ससा घेऊन येतो. भावनाचा स्वीकार अजूनही पूर्णपणे झालेला नाही हे तिला वारंवार जाणवून दिलं जातं. सिद्धू मात्र तिचा मानसिक आधार ठरतो. भावना हळूहळू सिद्धूशी जवळीक साधते आणि आनंदीच्या मनात स्वतःबद्दलचं आदर्श टिकून राहावं म्हणून इच्छा नसताना सुद्धा लग्नानंतरच्या रितीरिवाजात सहभागी होते. दुसरीकडे, वेन्की जयंतच्या पायावरचा ठसा पाहून तोच आपला बालमित्र असल्याची आठवण काढतो. पण जयंत आपल्या भूतकाळातल्या एका गुन्ह्याबद्दल अंतर्मुख होतो. जान्हवी त्याला सत्य समोर आणण्याचा आग्रह करते.
आता जयंतच सत्य सर्वांसमोर येईल का? भावना-सिद्धूच्या गोंधळात काय गोंधळ होईल? आनंदीला भावना आपल्या सोबत राहायला आणू शकेल का? लक्ष्मी निवासचा एपिसोड रात्री ८:०० वा झी मराठीवर पाहता येईल.