Santosh Juvekar | संतोष जुवेकरचा खतरनाक ‘रानटी’ अंदाज

संतोष जुवेकरचा खतरनाक ‘रानटी’ अंदाज
Santosh Juvekar
संतोष जुवेकर instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - मराठीसोबतच हिंदीतही सक्रीय असणारा अभिनेता संतोष जुवेकर आगामी ‘रानटी’ चित्रपटात दिसणार आहे. शरद केळकरच्या बालपणीच्या जिगरी मित्राची ‘बाळा’ची भूमिका तो साकारणार आहे. संतोषने आपल्या भूमिकेसाठी चक्क संपूर्ण केसांचे टक्कल करून घेत तसेच पायाने दिव्यांग व्यक्तिरेखा साकारण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. प्रदर्शित झालेल्या पोस्टरवरून त्याचा खतरनाक अंदाज पाहायला मिळत आहे. पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ हा मराठीतला सगळ्यात मोठा अ‍ॅक्शनपट २२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनेता संतोष जुवेकर त्याच्या दमदार भूमिकांसाठी ओळखला जातो. ‘बाळा’च्या भूमिकेसाठी त्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, मेकअपच्या साथीने भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी संतोषने घेतलेली मेहनतही नक्कीच मोलाची ठरते. या गेटअपमध्ये धावण्यापासून ते अगदी अॅक्शन सीन करण्यापर्यंतची मेहनत घेत ही भूमिका संतोषनी साकारली आहे. या वेगळ्या भूमिकेचं आव्हान स्वीकारत संतोषनी घेतलेली मेहनत ‘रानटी’ चित्रपटात दिसून येणार आहे.

आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना संतोष सांगतो की, ‘कोणतीही भूमिका एकरूप होऊन केली की, ती प्रेक्षकांपर्यंत सहजपणे पोहोचते. दिग्दर्शक समित कक्कडकडून मला नेहमी माझ्यातील अभिनयाला वाव देणाऱ्या भूमिका ऑफर झाल्या आहेत. त्याच्या चित्रपटात काम करण्यासाठी माझा उत्साह द्विगुणीत होतो. भूमिकेचं सोनं करण्यासाठी मी वाट्टेल ती मेहनत घेतो. ‘रानटी’ चित्रपटातील माझी ही खलनायकी भूमिका प्रेक्षकांना ‘बाळा’च्या प्रेमात पाडेल.

Santosh Juvekar
संतोष जुवेकर instagram

‘रानटी’ चित्रपटासाठी हृषिकेश कोळी यांचं लिखाण, अजित परब यांचं संगीत, अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत, एझाज गुलाब यांची साहसदृष्ये, सेतु श्रीराम यांचं छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचं संकलन अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेली टीम चित्रपटाला लाभलेली आहे.

Santosh Juvekar
Shiva TV Serial | शिवाने वाचवले सीताईचे सौभाग्य!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news