Shiva TV Serial | शिवाने वाचवले सीताईचे सौभाग्य!

सीताई शिवाला सून म्हणून स्वीकारेल?
Shiva TV Serial
शिवाने वाचवले सीताईचे सौभाग्य!instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - 'शिवा' मालिकेत सीताईच्या मनात आपल्यासाठी जागा निर्माण करण्याचे शिवाचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सीताई चिडलेली असताना, आशू शिवाला सीताईच्या मनाप्रमाणे वागण्याचा सल्ला देतो. शिवा घरातील सर्व काम करते आणि घरच्यांसाठी वेळेत नाश्ता बनवते. पण तरीही सीताई तिला टोमणे मारते. कीर्ती सीताईला तिच्या गैरहजेरीत शिवाने केलेल्या प्रतापाबद्दल सांगते. माणसांना आपलंसं केलं की, त्यांच्या गोष्टी पण आपल्याशा वाटतात असं आशू म्हणताच सीताईला धक्का बसतो. शिवा सीताईला मनवून आणायची जबाबदारी घेते. सीताई रस्त्याने जात असताना तेथे काही चोर येतात आणि सीताईच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतात. सीताई शिवाला काहीही कर पण माझं सौभाग्य मला परत हवं आहे असं सांगते. शिवा चोरांचा पाठलाग करते आणि त्यांना पकडून धडा शिकवते आणि सीताईची माफी मागायला लावते. शिवाच्या हाताला जखम झालेली पाहताच सीताई स्वतःचा साडीचा पदर फाडते आणि जखमेवर बांधते. (Shiva TV Serial)

या सगळ्यामुळे आता तरी सीताईच्या मनात शिवा बद्दल प्रेम निर्माण होईल? सीताई शिवाला सून म्हणून स्वीकारेल? या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी 'शिवा' रोज रात्री ९ वाजता झी मराठीवर पाहता येईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news