

वीकएंड सुरू झाला की अनेक प्लॅन्स आखले जातात. वीकएंडला काहीना भटकायला आवडते तर काहींना निवांत घरी वेळ घालवायला. हा वीकएंड ओटीटीवर पाहण्यासाठी काही खास शो शोधत असाल तर आम्ही तुमच्या मदतीला आहोत. या आठवड्यात ओटीटीवर अनेक रंजक सिनेमे आणि वेबसिरिज रिलीज होत आहेत. ज्यामध्ये अॅक्शन, थ्रीलर आणि हॉरर या सगळ्या जॉनरचे सिरिज आणि सिनेमे आहेत. पाहूया काय काय आहे या यादीत.
स्पेशल ऑप्स : या यादीतील पहिले आणि बहुचर्चित नाव आहे ते स्पेशल ऑप्स या सिरिजचे. या सिरिजचा दूसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. खरे तर तो मागच्या आठवड्यात रिलीज होणार होता. पण काही कारणास्तव त्याचे रिलीज पुढील आठवड्यात ढकलले गेले. या सिरीजमध्ये के के मेनन रॉ अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसतो आहे. ही सिरिज जिओ हॉटस्टारवर पाहता येऊ शकेल. या सिरिजमध्ये अभिनेता केके मेननशिवाय करण टॅकर, सैयामी खेर, विनय पाठक, मुजम्मिल इब्राहीम आणि मेहर वीज असे कलाकार आहेत. याशिवाय दुसऱ्या सीझनमध्ये प्रकाश राज, तोता रॉय चौधरी दिलीप ताहिल आणि गौतमी कपूर दिसणार आहेत
कुबेरा: दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जून, धनुष आणि रश्मिका मंदाना यांची भूमिका असलेला कुबेरा एका महिन्यांपूर्वीच थिएटरवर रिलीज झाला होता. आता तो ओटीटी रिलीजसाठी सज्ज आहे. एक भिकारी असलेल्या देवाने सिस्टिमसोबत दिलेला लढा या सिनेमात दिसतो आहे.
हा सिनेमा प्राइम व्हीडियोवर पाहता येऊ शकेल.
भुतनी: संजय दत्त, मौनी रॉय, पालक तिवारी आणि सनी सिंह यांची भूमिका असलेला सिनेमा 1 मेला रिलीज झाला होता. हा सिनेमा अजय देवगणच्या Raid 2 सोबत रिलीज झाली होती. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी चमक दाखवू शकली नव्हती. मौनी रॉय या सिनेमात भूताच्या भूमिकेत दिसते आहे.
वीर दास फूल वॉल्यूम: एमी अवॉर्ड विनर कॉमेडियन वीर दास पुन्हा एकदा ओटीटीसाठी सज्ज झाला आहे. वीर दास फूल वॉल्यूम या शोच्या माध्यमातून तो काही वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी शेयर करताना दिसेल. हा शो तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
भैरवम: तेलुगू सिनेमाचे फॅन असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. एका पवित्र जमीन आणि त्यावरुन होणारे वाद आणि लालचीपणा यावर हा सिनेमा आहे. या सिनेमात बेलमकोंडा साई श्रीनिवास, नारा रोहित आणि मंचू मनोज यांच्या भूमिका आहेत.