पुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सध्या त्यांच्या 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. यानिमित्ताने चित्रपटाच्या टीमने रॅपअपचे फोटो शेअर केले आहेत. चित्रपटात 'मुक्ताई'ची, संत ज्ञानेश्वरांची भूमिका कोण साकारणार? याविषयी उत्सुकता असून चित्रपटात काही नवे चेहरे दिसण्याची शक्यता आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी चित्रीकरण पूर्ण झाल्याची माहिती देताना सांगितले की, 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' चित्रपटाच्या चित्रीकरणाचा अनुभव खूपच दैवी होता आणि विलक्षण आंतरिक शांती प्रदान करणारा होता. आमच्या संपूर्ण टीम ने या चित्रीकरणाच्या दरम्यान अतीव मानसिक समाधान मिळाल्याचे वेळोवेळी सांगितले आहे.
संबंधित बातम्या –
ए. ए. फिल्म्स प्रस्तुत 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' चित्रपट जून २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'मुक्ताई'चे माता, भगिनी, गुरु असे वेगवेगळे पदर उलगडणाऱ्या 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' चित्रपटात 'मुक्ताई' यांचे बालपण आणि त्यांचा अध्यात्माचा प्रवास दाखविला जाणार आहे.