पुढारी ऑनलाईन डेस्क ; दिग्दर्शक, निर्माता संजीवकुमार राठोड यांनी प्रेम वारं हा नवा मराठी अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. देवदासी – देव आणि धर्माच्या नावावर ,स्वतःला खुश करण्यासाठी दुसऱ्याच्या आयुष्यात दुःख व वेदना पेरून, काटेरी आयुष्य उगवणारी प्रथा. याच कथेवर प्रकाश टाकून मनाला आणि आयुष्याला लखलख करणारी प्रेम कहाणी म्हणजे मराठी अल्बम प्रेम वार!
संगीत दिग्दर्शक कृष्णा दाभाडे आणि प्रशांत फसगे यांनी गाणी स्वरबद्ध केली आहेत. कृष्णा दाभाडे, प्रतीक्षा भाटिया यांनी गीतकार म्हणून सुमित वाघमारे, अभिजीत आणि आर .आर .कोलेकर यांचं योगदान आहे .
उत्कृष्ट गाण्यासाठी संजीवकुमार राठोड, सतीश रमेश काकडे, रुपेश सुरेश रोकाटे, प्रमोद कांबळे यांनी धुरा सांभाळली आहे. या सुंदर गाण्यांत अभिनेता संकेत मोरे व अभिनेत्री श्रेया पळसकर यांनी दमदार कामगिरी केली आहे.