The Kerala Story च्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास केरळ हायकोर्टाकडून नकार, ‘तो’ टीझरही हटवणार | पुढारी

The Kerala Story च्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास केरळ हायकोर्टाकडून नकार, 'तो' टीझरही हटवणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुदीप्‍तो सेन यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘द केरला स्‍टोरी’ चित्रपटाला मोठा दिलासा मिळाला आहे. (The Kerala Story ) केरळ हायकोर्टाने शुक्रवारी चित्रपटाच्या रिलीजवर बंदी आणण्यास नकार दिला. हा चित्रपट समाजात संघर्ष आणि जातीयवाद निर्माण करत नाही. ही फिल्‍म फिक्‍शन आहे, इतिहास नाही, असे कोर्टाने सांगितले. (The Kerala Story )

‘केरला स्टोरी इस्लाम विरोधात नाही तर इसिसविषयी आहे,’ असे केरळ हायकोर्टाने सांगितले. सोबतच चित्रपट निर्मात्यांना आदेश दिला की, त्यांनी ३२००० महिलांविषयी दावा करणारा टीझर यूट्यूब आणि तमाम सोशल मीडिया प्‍लॅटफॉर्मवरून हटवावा.

“द केरला स्टोरी”च्या निर्मात्याने केरळ उच्च न्यायालयाला सांगितले की, केरळमधील ३२ हजारांहून अधिक महिलांना ISIS मध्ये भरती करण्यात आल्याचा दावा करणारा चित्रपटाचा टीझर त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काढून टाकला जाईल. यासंदर्भात उच्च न्यायालयाने निवेदन नोंदवले.

अदा शर्मा स्टारर ‘The Kerala Story’ शुक्रवारी चित्रपट रिलीज झाला.

Back to top button