Sanjay Dutt : ‘लिओ’ तील संजूबाबाचा जबरदस्त लूक

Sanjay Dutt
Sanjay Dutt

पुढारी ऑनलाईन : अभिनेता संजय दत्त ( Sanjay Dutt ) सध्या खूपच चर्चेत आहे. नुकताच त्याने आपला ६४ दिवस साजरा केला. आता तो दाक्षिणात्य सुपरस्टार विजय थलपथीच्या 'लिओ' चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. निर्मात्यांनी चित्रपटातील संजूच्या लुकची पहिली झलक शेअर केली आहे.

लोकेश कनागराज दिग्दर्शित 'लिओ' या सिनेमात थलपती विजय व्यतिरिक्त संजयही महत्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात संजय खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या लूकच्या व्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. त्याचा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.

याअगोदर संजयने नायक म्हणून चाहत्यांची मने जिंकली आहेत. पण आता खलनायकाच्या भूमिकेतही तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या चित्रपटही संजय खलनायक अँथनी दासच्या भूमिकेत झळकणार आहे. ३० सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये त्याचा जबरदस्त खलनायक रूप दाखवले आहे.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news