Sanjay Dutt | 'मी तुरुंगात थिएटर ग्रुप सुरू केला; खुनाचे दोषी माझे कलाकार होते'

Sanjay Dutt | 'मी तुरुंगात थिएटर ग्रुप सुरू केला; खुनाचे दोषी माझे कलाकार होते'
image of Suniel Shetty- Kapil Sharma-Sanjay Dutt
Sanjay Dutt and Suniel Shetty in The Great Indian Kapil Show Instagram
Published on
Updated on

Sanjay Dutt shared story during prison period in The Great Indian Kapil Show

मुंबई - कॉमेडीचा बादशाह कपिल शर्माचा 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या नव्या प्रोमोने सर्वांचेच लक्ष वेधले. शोच्या नव्या प्रोमोमध्ये बॉलीवूडचे दोन दमदार अभिनेते संजय दत्त आणि सुनील शेट्टी दिसत आहेत. कपिल शर्मा या दोन्ही स्टार्स विषयी त्यांचे वैयक्तिक आणि प्रोफेशनल जीवनाविषयी जाणून घेतलं.

संजय दत्तने कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये सुनील शेट्टीसोबत हजेरी लावली. त्याने तुरुंगात घालवलेल्या वेळेविषयी सांगितले. संजय दत्तने खुद्द तुरुंगातील अनुभव शेअर केले. त्याच्या अभिनयाच्या आवडीमुळे त्याला तुरुंगातील वेळ घालवण्यासाठी कशी मदत झाली, याबद्दल त्याने खुलासा केला. तो म्हणाला, त्याने तुरुंगात एक थिएटर ग्रुप स्थापन केला होता, ज्यामध्ये खुनाचे दोषी त्याचे कलाकार होते.

त्याच्या आयुष्याबद्दल त्याने अनेक गोष्टींचा उलगडा केला. संजय म्हणाला, ''माझ्या आयुष्यात घडलेल्या कोणत्याही गोष्टीचा मला पश्चात्ताप नाही. माझे मुख्य दुःख म्हणजे माझे पालक मला खूप लवकर सोडून गेले. मला त्यांची खूप आठवण येते.''

त्यानंतर, अर्चना पूरन सिंगने संजयला विचारले की, तुरुंगात सुतारकाम करताना त्याने तयार केलेल्या फर्निचरचे काय केले?

image of Suniel Shetty- Kapil Sharma-Sanjay Dutt
Shekhar Suman | मुलगा गमावल्यानंतर खचलो होतो; जगाला हसवणाऱ्या शेखर सुमनने सांगितला डोळे पाणावणारा प्रसंग

संजय म्हणाला, ''मी तिथे मजुरी मिळवत असे. मी खुर्च्या बनवलेल्या असो किंवा कागदी पिशव्या बनवलेल्या असो, मला पैसे मिळत असत. मग मी रेडिओ व्हायसीपी नावाचे एक रेडिओ स्टेशन देखील सुरू केले. ते एकेकाळी फक्त तुरुंगातच वाजवले जात असे. त्यासाठी मला पैसेही मिळत असत. मी रेडिओ कार्यक्रम केला. आमच्याकडे बोलण्यासाठी विषय होते आणि आम्ही काही विनोदही केले. या कार्यक्रमाची पटकथा तीन-चार इतर कैदी लिहित असत.''

image of Suniel Shetty- Kapil Sharma-Sanjay Dutt
Ajay Devgn Maidaan Movie | बजेट १२० कोटी, पण खर्च २१० कोटी! बोनी कपूरने सांगितलं मैदान कसा गेला तोट्यात?

'खून प्रकरणातील दोषी माझे कलाकार होते'

संजय पुढे म्हणाला, ''मी एक थिएटर ग्रुप देखील सुरू केला होता आणि मी दिग्दर्शक होतो आणि खून प्रकरणातील दोषी माझे कलाकार होते.''

प्रेक्षक आपल्या गर्लफ्रेंड आणि पत्नीसह पोहोचला शोमध्ये

दरम्यान, प्रेक्षक वर्गातून एक प्रेक्षक उभा राहतो आणि म्हणतो, 'मी आज माझी पत्नी आणि गर्लफ्रेंड दोघींसोबत येथे आलो आहे.'. हे ऐकताच संजय दत्त, सुनील शेट्टी, कपिल शर्मा, अर्चना पूरन सिंह अवाक राहतात. ते आपल्या जागेवर उभे राहतात. संजय दत्त त्याला विचारतो की, 'हे तुम्ही कसे केलं, आम्हाला देखील सांगा? आता याचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होताच प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय.

काय म्हणाले युजर्स?

एका युजरने लिहिलं, 'संजय, सुनील शॉक्ड, भाई रॉक्ड'. दुसऱ्या युजरने लिहिलं, 'हा एपिसोड टीआरपीचे सर्व रेकॉर्ड तोडणार आहे.' तिसऱ्या युजरने लिहिलं, 'याला म्हणतात, वर्क लाईफ बॅलेन्स'. संजय दत्तच्या बायोपिकमध्ये खुलासा झाला होता की, त्याच्या ३५० गर्लफ्रेंड होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news