

Who Was Miss Puducherry Model San Rechal end of life
मुंबई - २६ वर्षीय मॉडल, मिस पुडुचेरी सॅन रॅशेलने वयाच्या २६ व्या वर्षी आपले जीवन संपवले. तिने रंगभेद आणि इंडस्ट्री मध्ये होणाऱ्या भेदभावविरोधात उघडपणे आवाज उठवला होता. तिच्या जाण्याने फॅशन जगतात शोककळा पसरली आहे. रिपोर्टनुसार, ती डिप्रेशनमध्ये होती. रेचलने वडिलांशी बातचीत केल्यानंतर जीवन संपवले. तिच्याकडे एक नोट देखील सापडली आहे, त्यामध्ये लिहिलंय की, तिच्या मृत्यूला कुणीही जबाबदार धरू नये. रेचलचे मागील वर्षी लग्न झाले होते.
रिपोर्टनुसार, सॅन रॅशेलच्या मृत्यूनंतर तहसीलदारने तपासाचे आदेश दिले आहेत. ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर देखील होती. ती आर्थिक समस्या आणि वैयक्तिक आव्हानांशी लढत होती. त्यामुळे रविवारी तिने पुडुचेरीमध्ये जीवन संपवले. तिने आपल्या वडिलांच्या घरी गेल्यानंतर खूप साऱ्या झोपेच्या गोळ्या खाल्ल्या होत्या. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले होते. पण, तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. अशीही माहिती समोर येतेय की, कामासाठी पैसे गोळा करण्यासाठी तिने आपले दागिने देखील गहाण ठेवले होते.
मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी सांगितले की, रचेल नैराश्याशी झुंजत होती आणि तिने ५ जुलै रोजी पुडुच्चेरी शहराच्या हद्दीतील तिच्या घरी जास्त झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या. तिला उपचारासाठी इंदिरा गांधी सरकारी जनरल हॉस्पिटल आणि पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले होते. पण, तिला डिस्चार्ज मिळण्यापूर्वीच ती तिथून निघून गेली होती. काही दिवसांनी तिची प्रकृती बिघडली आणि तिला मूलकुलम येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला पुढील उपचारांसाठी जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (जिपमेर) येथे रेफर करण्यात आले होते. उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला.
२०१९ मध्ये मिस डार्क क्वीन तामिळनाडू तिने जिंकले होते. शिवाय मिस पुडुच्चेरी २०२१ आणि मिस बेस्ट अॅटिट्यूड २०१९ किताब तिने जिंकले होते. तिची Miss World title जिंकण्याची आकांक्षा होती. तिने लंडन, जर्मनी आणि फ्रान्समधील अनेक आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. अनेक किताबही जिंकले होते. महिलांच्या सुरक्षिततेबद्दल आणि जागरूकतेबद्दल तिने अनेक सार्वजनिक व्यासपीठांवर भाषणे देखील दिली होती.