

Stuntman Raju Mohan Raj Death during Shooting
मुंबई - दाक्षिणात्य चित्रपटाचे प्रसिद्ध स्टंटमॅन राजू (मोहनराज) यांचा हृदयद्रावक मृत्यू झाला. दिग्दर्शक पा. रंजित आणि अभिनेता आर्या यांच्या आगामी चित्रपटाच्या सेटवर मोठी दुर्घटना झाली. सेटवर कार स्टंट करताना स्टंट आर्टिस्ट राजू यांचे निधन झाले. दाक्षिणात्य अभिनेते विशाल यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून स्टंटमॅन राजूच्या निधनाची पुष्टी केली आहे.
डायरेक्टर पा. रंजीत, नागपट्टिनममध्ये नवा चित्रपट 'वेट्टूवम'चे शूटिंग करत हते. सेटवर स्टंट करताना एक मोठी दुर्घटना झाली ज्यामध्ये स्टंटमॅनचा मृत्यू झाला. आता एका व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये एक खतरनाक स्टंट करताना ही घटना घडली.
स्टंटमॅन राजू एक एसयुव्ही गाडी चालवत होते, रॅम्पवरून गाडी वेगात जाते आणि ती उलटते. गाडी थेट खाली पडली आणि गाडीचा पुढील भाग जोराने जमीनीवर आपटला. ही घटना १३ जुलैची असून व्हिडिओमध्ये त्यांना गाडीतून बाहेर काढताना दिसत आहे.
राजू यांच्या निधनानंतर तमिळ अभिनेता विशाल यांनी दु:ख व्यक्त करत कठीण समयी स्टंट आर्टिस्टच्या कुटुबीयांना मदत करण्याचे आश्वासन दिसे. त्यांनी X वर पोस्ट शेअर करून लिहिलं-
'या गोष्टीवर विश्वास ठेवणं खूप कठीण आहे की, आमचे बहादुर स्टंट आर्टिस्ट राजू यांचे आर्या आणि रंजित यांच्या चित्रपटासाठी कार स्टंट करताना निधन झाले. मी त्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. त्यांनी माझ्या चित्रपटासाठी अनेक खतरनाक स्टंट केले होते. ते एक धाडसी व्यक्ती होते. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो आणि परिवाराला हे दु:ख सहन करण्याची ताकद देवो. मी केवळ ट्विटच करत नाही तर त्यांच्या परिवाराला जितकं शक्य होईल, तितकं मदत करेन. कारण मी या चित्रपट इंडस्ट्रीतून आहे आणि त्यांनी अनेक चित्रपटांसाठी योगदान दिलं आहे...मी त्यांच्या परिवाराला सपोर्ट करेन.'