गुन्हेगारी जगताचा वेध घेणारी ‘धारावी बँक’

धारावी बॅँक चित्रपट
धारावी बॅँक चित्रपट

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्वत:ला पडलेले प्रश्न, आजबाजूच्या समस्या दिग्दर्शक समित कक्कड यांनी आपल्या सिनेमातून आजवर मांडल्या आहेत. 'हुप्पा हुय्या' हाफ तिकीट, आयना का बायना', 'आश्चर्यचकित', 'इंदौरी इश्क', '३६ गुण' यासारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून हे दिसून आलं आहे.

'आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी' ही धारावीची ओळख असली तरीही त्यापलीकडे तिच्या अंतरंगात बऱ्याच गोष्टी दडल्या आहेत. या गोष्टींचा मागमूस बाहेरच्यानां लागत नाही. दारिद्र्य, गुन्हेगारीचं जाळ याच्या विळख्यात अडकलेली धारावी मोठया उद्योगांच केंद्र सुद्धा आहे. हे सांगत तिथल्या विश्वाची वेगळी बाजू मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक समित कक्कड यांनी आपल्या 'धारावी बँक' या आगामी हिंदी वेबसीरिजमध्ये केला आहे. १९ नोव्हेंबरला मॅक्स प्लेयरवर ही वेबसिरीज प्रदर्शित झाली आहे.

'धारावी बैंक, अपने आप में एक इंडस्ट्री है. शिपिंग पोर्ट से लेकर स्पोर्ट्स तक, रियल स्टेट से लेकर पॉलीटिशियन तक, थलाइवन के पैर सब जगह हैं. पर निशान कहीं भी नहीं." धारावीची ही ओळख करून देतानाच गुन्हेगार आणि पोलिसांची होणारी धुमश्चक्री, तिथलं राजकारण व तिथे चालणाऱ्या धंद्याचा ऊहापोह समित यांनी 'धारावी बँक' या वेबसीरिजमध्ये केला आहे. समितच्या मते मुंबईतील सुंदर ठिकाण म्हणजे धारावी. समित याच बालपण याच परिसरात गेल्याने हे सगळं त्यांनी जवळून अनुभवलं आहे.

'धारावी बँक' ही वेबसीरिज काल्पनिकच आहे. पण वास्तवातील बरेच संदर्भ या सीरिजमध्ये दाखवले आहेत. झोपडपट्टी हे गुन्हेगारांसाठी मोक्याचं ठिकाण असतं आणि नेमकं तेच हेरून समित कक्कड यांनी एक उत्तम क्राईम थ्रिलर सिरीज तयार करून प्रेक्षकांसमोर आणली आहे. या वेबसीरिजची निर्मिती झी स्टुडिओची आहे. एमएक्स प्लेअरचे चीफ कंटेट ऑफिसर गौतम तलवार तर सीनियर क्रिएटीव्ह प्रोड्यूसर पेरसी जामशेदजी आहेत.

अभिनेता सुनील शेट्टी या सीरिजच्या माध्यमातून ओटीटी विश्वात पदार्पण करत आहे. गुन्हेगारी विश्वाचा सर्वेसर्वा 'थलाईवन' हे पात्र सुनील शेट्टीने साकारलं आहे. याबरोबरच अभिनेता विवेक ओबेरॉय यामध्ये जेसीपी जयंत गावस्कर या पोलिस अधिकाऱ्याच्या डॅशिंग भूमिकेत दिसणार आहे. सोनाली कुलकर्णी, संतोष जुवेकर, नागेश भोसले, फ्रेडी दारूवाला, सिद्धार्थ मेनन, चिन्मय मांडलेकर, जयवंत वाडकर ,शांती प्रिया, ल्यूके किनी, वामशी कृष्णन, भावना राव, समीक्षा भटनागर, श्रुती श्रीवास्तव, हितेश भोजराज, पवित्रा सरकार, रोहित पाठक सारखे कलाकारही यात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

या वेबसीरीजचे लेखन सार्थक दास गुप्ता यांचे आहे. छायांकन विजय मिश्रा तर संकलन आशीष म्हात्रे, अपूर्वा मोतीवाले सहाय यांचे आहे. ॲक्शन विक्रम दहिया तर वेशभूषेची जबाबदारी किन भाटिजा यांनी सांभाळली आहे. प्रोडक्शन डिझाईन वाडिया खान, राकेश यादव, तर बीजीएम अमर मोहिले यांनी केले आहे. कास्टिंग कुणाल शहा तर व्हीएफएक्स पंकज अजवानी यांचे आहे. साउंड डिझायनिंग आणि मिक्सिंग अजय कुमार पीबी यांचे आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news