

माजी पती नागा चैतन्यने पुन्हा नवी सुरुवात केल्यानंतर अभिनेत्री समंथा देखील नव्या नात्याकडे वळण्याची चिन्हे दिसत आहेत. समंथा सध्या अमेरिका ट्रीपवर आहे. पण विशेष म्हणजे या ट्रीपमध्ये ती रूमर्ड बॉयफ्रेंड दिग्दर्शक राज निदीमोरू याच्यासोबत दिसून आली. दोघांची जवळीक नवीन नात्याची सुरुवात तर नाही ना अशी शंका फॅन्सच्या मनात आली नसेल तर नवलच.
समंथाने नुकतीच तेलुगु असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका (TANA) 2025 एडिशनमध्ये सहभाग नोंदवला. यावेळी तिने काही फोटोही शेयर केले. आहेत. यामधील या एका फोटोमध्ये ती आणि राज दिसत आहेत. या फोटोत तिने राजच्या कमरेला विळखा घातला आहे तर राजने तिच्या खांद्यावर हात ठेवला आहे. तर दुसऱ्या फोटोत समंथा आणि राज इतर मित्रमैत्रिणीसोबत दिसत आहेत.
या फोटोच्या कॅप्शन एविल आय आणि हार्ट इमोजी बनवला आहे. यावर फॅन्सनी मात्र दिलखुलास कमेंट्स केल्या आहेत.
एक युजर विचारतो, बेबी, हे ऑफीशियल आहे का? दूसरा म्हणतो की, 'मी तुझ्यासाठी खूप खुश आहे सॅम’. तर दूसरा म्हणतो, फायनली तुम्हाला तुमचे प्रेम मिळाले.’ खरेतर अजून समंथा किंवा राज दोघांनीही आपल्या नात्याबाबत काहीच स्पष्ट केले नाही.
द फॅमिली मॅन सीझन 2 आणि सीटाडेल हनी बनी या सिरिजच्या दरम्यान राज आणि समंथाची भेट झाली होती. तेव्हापासून हे दोघे नात्यात असल्याचे बोलले जात आहे.
समंथाला भेटण्यापूर्वी राज विवाहित होता. 2002 मध्ये त्याने पत्नी शामली हिला घटस्फोट दिला. मध्ये राजला एक मुलगी असल्याचे समोर आले होते. पण कालांतराने ही अफवाच असल्याचे सिद्ध झाले आहे. अर्थात चाहते मात्र या दोघांच्या बॉंडिंगमुळे जास्तच खुश आहे.