

मुंबई : सलमान खानने सोशल मीडिया एक्स हँडलवर एक ट्विट केलं. पुढे काही वेळानंतर त्याने ते डीलिट केलं. दुसरीकडे लोक त्याला काय काय म्हणातहेक पाहुया. काही फॅन्सनी त्याने केलेल्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली तर काहींनी त्याच्यावर टीका केली.
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावादरम्यान, सीजफायरवर बॉलीवूड अभिनेता सलमान खानने दिलासा व्यक्त करत सोशल मीडियावर लिहिलं, “सीजफायरसाठी आभारी आहे.” पण काही वेळानंतर त्याने हे ट्विट डिलीट केलं. त्यानंतर या ट्विटवरून सोशल मीडियावर युजर्समध्ये वाद निर्माण झाला. तर अनेक युजर्सनी त्याच्यावर टीका केली.
सलमान खानचे हे ट्विट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला. एकीकडे काही लोक सलमानच्या प्रतिक्रियेला सकारात्मक मानत सीजफायरचे स्वागत केले होते. दुसरीकडे अनेक युजर्स म्हणाले, जेव्हा भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदूर चालवले होते. तेव्हा सलमानने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. परंतु, जसे सीजफायरची घोषणा झाली. त्याने ट्विट केलं आणि नंतर डिलीट केलं.
एका युजरने ट्विट केलं, ''सलमान खान आणि अन्य बॉलीवुड स्टार्स, ज्यांचे पाकिस्तान आणि मध्य-पूर्वमध्ये मोठा फॅन बेस आहे, त्यांच्यावर टीका होत नाही..''
आणखी एकाने म्हटले- सलमानला पाकिस्तान सोबत शांती हवीय...भारतासाठी नाही तर स्वत:ला पाकिस्तानी मीडियामध्ये हिरो बनण्याचा प्रयत्न करत आहे.”