

Sitare Zameen Par Release Date changed
मुंबई : मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खानचा सितारे जमीन पर या आगामी चित्रपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वी रिलीज झाले होते. हा चित्रपट २० जूनला रिलीज होणार असल्याची घोषणा ही करण्यात आली होती. पण आता रिलीज डेटविषयी अपडेट्स समोर आली आहे. चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसने देशाचे वातावरण पाहता सितारे जमीन पर ट्रेलर इव्हेंट पुढे ढकलले आहे. निर्मात्यांचे असे मानणे आहे की, एक जबाबदार नागरिक म्हणून ही वेळ एकता आणि संयमाने देशासोबत उभे राहण्याची गरज आहे.
मीडिया रिपोर्ट्समध्ये हेदेखील म्हटले जात आहे की, आमिर अशा वेळी चित्रपट रिलीज करणार नाही. त्यासाठी नव्या तारखेची घोषणा लवकरच केली जाण्याची शक्यता आहे. सध्या रिलीज डेट पुढे ढकलल्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती निर्माते, प्रोडक्शन हाऊसकडून आलेले नाही. याआधीही सितारे जमीन पर चित्रपटाची रिलज डेट पुढे ढकलण्यात आली होती. मागील वर्षी २०२४ च्या डिसेंबरमध्ये हा चित्रपट रिलीज होणार होता.
'सितारे जमीन पर' या चित्रपटाचे दिग्दर्शन आरएस प्रसन्ना यांनी केले आहे. या चित्रपटात जेनेलिया देशमुख मुख्य भूमिका साकारत आहे. एका 'चिडखोर' बास्केटबॉल प्रशिक्षकाची भूमिका त्याने चित्रपटात साकारली आहे.