सलमानच्या फार्महाऊसवर जाण्याचा निर्णय तुमचा, परतण्याची वेळ मात्र दबंग खानच ठरवतो..

गॅलेक्सी सोडून सलमान खान फार्महाऊसमध्ये का राहतो? आयुष शर्माने सांगितले गुपित
bollywood news
सलमानच्या फार्महाऊसवर जाण्याचा निर्णय तुमचा, परतण्याची वेळ मात्र दबंग खानच ठरवतो..file photo
Published on
Updated on

salman khan spends more time at farmhouse away from limelight says jiju aayush sharma

पुढारी ऑनलाईन : सलमान खानचे फार्महाऊस हे बॉलिवूडमधील कलाकारांसाठी एखाद्या पार्टी हबपेक्षा कमी नाही. सलमानच्या फार्महाऊसवर न्यू इयर, ख्रिसमस आणि वाढदिवसाचे सेलिब्रेशन होत असतात. बॉलिवूडमधील अनेक कलाकारही सलमानच्या फार्महाऊसवर मस्ती करताना दिसतात. आता सलमान खानचा जिजू आयुष शर्माने सलमानच्या वैयक्तिक आयुष्याबाबत काही खास गोष्टींचा खुलासा केला आहे.

सलमान खान हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक चमकदार नाव आहे. अनेक वर्षांपासून ते चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. दबंग खानची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. मीडिया देखील सलमान खानला कॅमेऱ्यात कैद करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र, सततची प्रसिद्धी आणि लोकांच्या नजरेपासून दूर राहण्यासाठी सलमान खान अनेकदा पनवेल येथील त्‍याच्या फार्महाऊसवर शांतपणे वेळ घालवायला आवडते. सलमान खानचा दाजी आयुष शर्मा याने अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खास गोष्टी सांगितल्या आहेत.

bollywood news
'आम्ही घाबरलो होतो, आंदोलक हल्ला करतील असे वाटले'; CJP आंदोलनावर कंगना रणौत यांची प्रतिक्रिया

सलमानच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आयुष शर्माचा खुलासा

आयुष शर्माने सांगितले की, सलमान खानला फार्महाऊसवर राहायला अधिक आवडते. तो आपला बराचसा वेळ तिथेच घालवतो. आयुषने कुटुंबातील एका मजेशीर विनोदाबद्दलही सांगितले.

एका मुलाखतीत आयुष शर्मा म्हणाला, "भाईने फार्मवर बोलावलं आहे..." त्यावेळी सगळ्यांच्याच तोंडी एकच वाक्य असते, "चला फार्मवर जाऊया." मात्र, खरं तर तिथे फक्त त्याच व्यक्तीला जाता येतं, जिला सलमान यांनी खास आमंत्रण दिलं आहे.

आयुषने पुढे सांगितले की, खरी गंमत तर आमंत्रण स्वीकारल्यानंतर सुरू होते. सलमान यांच्या फार्महाऊसवर जाण्याचा निर्णय पाहुण्याचा असतो, पण तिथून परतण्याची वेळ मात्र फक्त सलमानच ठरवतात.

bollywood news
CJP Protest Delhi : मी माफी मागतो; CJP प्रमुख अभिजीत दीपकेंनी म्हणून मागितली आंदोलकांची माफी..

याबाबत बोलताना आयुष म्हणाला, "भाई फार्महाऊसवर जास्त वेळ घालवतात. जेव्हा ते तुम्हाला फार्मवर बोलावतात, तेव्हा तुम्ही तुमच्या इच्छेने तिथे जाऊ शकता; पण परत कधी यायचं, हे मात्र भाई ठरवतात."

लूकमुळे चर्चेत सलमान खान

सलमान खान सध्या त्‍याच्या बदललेल्या लूकमुळे चर्चेत आहेत. एका कार्यक्रमातील सलमान यांचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर त्यांच्या आरोग्याबाबत चाहते चिंतेत दिसून आले. सलमान यांच्या डोळ्यांमध्ये थकवा आणि चेहऱ्यावर उदासपणा दिसत असल्याने अनेक चाहते काळजीत पडले. काही जणांनी तर सलमान आजारी असल्याचा दावाही केला. मात्र, चाहत्यांच्या या प्रश्नांना दबंग खानने आपल्या खास अंदाजात उत्तर देत सर्वांची बोलतीच बंद केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news