CJP Protest Delhi : मी माफी मागतो; CJP प्रमुख अभिजीत दीपकेंनी म्हणून मागितली आंदोलकांची माफी..

जंतर-मंतर येथील आंदोलकांना बळाचा वापर करून हटवण्‍यात आले असले, तरी संसद परिसरात ठिकठिकाणी हे आंदोलन पसरले.
CJP Protest Delhi
CJP Protest Delhi : मी माफी मागतो; CJP प्रमुख अभिजीत दीपकेंनी म्हणून मागितली आंदोलकांची माफी..file photo
Published on
Updated on

abhijeet dipke apology from injured protesters

पुढारी ऑनलाईन : ‘नीट’ परीक्षा पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्‍या राजीनाम्‍याची मागणी करत कॉक्रोच जनता पार्टीच्‍या आवाहनाला मोठा प्रतिसाद देत हजारो विद्यार्थ्यांनी, युवा कार्यकर्त्यांनी सोमवारी दिल्लीत आंदोलन सुरू केले आहे.

CJP Protest Delhi
Ayodhya Ram Mandir : देणगी चोरीनंतर ट्रस्टच्या कामकाजात बदल, आता मासिक लेखापरीक्षण अहवाल वेबसाइटवर अपलोड होणार

जंतर-मंतर येथील आंदोलकांना बळाचा वापर करून हटवण्‍यात आले असले, तरी संसद परिसरात ठिकठिकाणी हे आंदोलन पसरले. कॉक्रोच जनता पार्टी हे निमित्त असले, तरी प्रत्‍यक्षात येथे दाखल झालेल्‍या हजारो विद्यार्थ्यांनीच हे आंदोलन हातात घेतल्‍याचे चित्र होते. तरुणांचा हा आक्रोश संसदेच्‍या दारापर्यंत पोहोचवण्‍यात त्‍यांना यश मिळाले.

दरम्यान अभिजीत दीपके यांनी सोमवारी संसद मार्चदरम्यान पोलिसांच्या कारवाईत जखमी झालेल्या आंदोलकांची माफी मागितली आहे. कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक दीपके यांनी आंदोलकांना वाचवण्यासाठी आपण आणखी काही चांगले करू शकलो असतो, असे म्हटले आहे.

कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांनी सोमवारी झालेल्या 'संसद मार्च'दरम्यान जखमी झालेल्या आंदोलकांची माफी मागितली आहे. दीपके यांनी पोलिसांवर बर्बरतेचा आरोप करत, आंदोलकांना वाचवण्यासाठी आपण आणखी काही चांगले करू शकलो असतो, असे म्हटले आहे. जखमी झालेल्या आंदोलकांशी वैयक्तिकरित्या बोलून त्यांची माफी मागण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.

CJP Protest Delhi
CJP Parliament March Police Attack: सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसाला ओढून घसटत नेलं... CJP ने केला दावा

संसद मार्चच्या दुसऱ्या दिवशी, मंगळवारी अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलिसांकडून कथितरित्या मारहाण झालेल्या आंदोलकांची, विशेषतः मुलींची माफी मागितली. स्वतः जंतर-मंतरवर उपस्थित राहिल्यामुळे टीकेचा सामना करणाऱ्या दीपके यांनी म्हटले, "मी माझ्या सर्व समर्थकांची, विशेषतः ज्या मुलींना पुरुष पोलिस कर्मचाऱ्यांनी मारहाण केली, त्यांची माफी मागतो. मी आणखी चांगले करू शकलो असतो. दिल्ली पोलिसांच्या अमानुष कारवाईपासून तुम्हाला वाचवण्यासाठी मी काहीतरी अधिक चांगले करू शकलो असतो."

मी लढत राहणार : अभिजीत दीपके

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेतल्याबद्दल दीपके यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ते म्हणाले, "२० मुलांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या एका धर्मेंद्र प्रधान यांना वाचवण्यासाठी सरकार अनेक तरुण मुलांचे रक्त सांडू इच्छिते. जर तुम्ही जखमी झाला असाल आणि ही पोस्ट पाहत असाल, तर कृपया मला डायरेक्ट मेसेज करा. मला तुमच्याशी वैयक्तिकरित्या बोलायचे आहे आणि तुमची माफी मागायची आहे. मी तुमच्यासाठी लढत राहीन."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news